21 फेब्रुवारी Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - कारसोबत झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. लॉकडाऊसंदर्भातील अफवा पसरवाल, तर दंडात्मक कारवाई
नांदेड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत असल्याच्या बातम्या, संदेश हे पुर्णत: चुकीचे असून ज्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर ट्विटर,
अथवा
इतर कोणत्याही सोशल मिडियावर जर कोणी हे संदेश पसरवले
2. कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही मानसिकता बदलण्याची गरज : मुख्यमंत्री
कोरोनाचा लढा हा संपलेला नाही, कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपारिक 10 ते 5 ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्यासाठी केंद्रानं राष्ट्रीय धोरण आखावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे.
3. अखेर वनमंत्री संजय राठोड सहकुटुंब पोहरादेवीत येणार
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणींमध्ये वाढ होतानाचं चित्र दिसत असतानाच आता अखेर अनेक आरोप –प्रत्यारोपांच्या सत्रांमध्ये जवळपास 12 दिवसांपासून नॉट रीचेबल असणारे राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे सहपरिवार 23 फेब्रुवारीला पोहरादेवी येथे धर्मपीठावर येणार आहे.
4. अकोल्यात 34 तासांचा लॉकडाऊन
अकोल्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असून .काल रात्री 8 पासून सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत असा 34 तासांचा हा लॉकडाऊन असणार आहे.
5. चतारी ग्रामीण रुग्णालयातील गहाळ कोरोना लस प्रकरणाला नवीन वळण
अकोला जिल्ह्यातील चतारी ग्रामीण रूग्णालयातून गहाळ झालेल्या कोरोना लस प्रकरणाला आता नवीन वळण मिळालंय..कंत्राटी कर्मचारी दिपक सोनटक्केनं कोरोना लसीच्या सातही बॉटल गहाळ केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय.
6. कारसोबत झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव शिवारात पेट्रोल भरण्यासाठी जात असलेल्या दुचाकीला कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय.
7. डोंबिवलीतील के.व्ही.पेंढारकर महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पेंढारकर महाविद्यालयाला विद्यापीठाच्या अनुदान आयोगाने दहा वर्षाच्या कालावधीसाठी स्वायत्त दर्जा दिला आहे.
8. डोंबिवली मधील माणुसकीची भिंत मुळे गरीब लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद
कल्याण- डोंबिवली मध्ये अनेक ठिकाणी माणुसकीची भिंत असा उपक्रम राबवला जातोय .या उपक्रमाला नागरिक देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
9. मुंबई पोलिसांना मोठं यश, कुख्यात गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मिळाला
अखेर मुंबई पोलिसांना कुख्यात गँगस्टर रवी पुजारीचा ताबा मिळाला आहे. कर्नाटक न्यायालयाने मुंबई पोलिसांना रवी पुजारीचा ताबा घेण्यासाठी आज परवानगी दिली. गेली वर्षभर मुंबई पोलीस रवी पुजारीचा ताबा मिळावा याकरता न्यायालयीन लढा देत होते.
10. गजानन मारणेला दणका देण्यासाठी पोलीस सज्ज
पुण्यात कुख्यात गुंड गजानन मारणे हा सध्या शहरात चर्चेचा विषय आहे. तळोजा जेलमधील सुटकेनंतर मारणे समर्थकांनी काढलेल्या मिरवणुकीमुळे अनेकांना उत्तर प्रदेश, बिहारची आठवण झाली आणि प्रशासनावर टीकेची झोड उठली. हे प्रकरण ताजे असतानाच आता गजानन मारणे हा फरारही झाल्याने पुणे पोलिसांची चांगलीच अडचण झाली.
No comments
Post a Comment