सह्याद्री Breaking - अत्याचार प्रकरणी वाघ वर गुन्हा दाखल
News24सह्याद्री -
वादग्रस्त असलेला पोलिस निरीक्षक विकास वाघ याच्यावर पुन्हा एकदा अत्याचार केल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे 11 फेब्रुवारी रोजी अत्याचार करून महिलेचे मंगळसूत्र घेऊन गेल्या बाबत चा गुन्हा तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे विकास वाघ कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये असल्यापासून चांगलाच चर्चेत राहिलेला अधिकारी आहे त्याच्या अनेक कृत्यांनी पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली होती कोतवाली मधून त्याला आर्थिक गुन्हे शाखेत ही पाठवण्यात आले होते मात्र तेथे गेल्यानंतरही त्यांचे कृत्य काही थांबत नसल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे नगर शहरातील गंगा उद्यान परिसरात त्याने एका महिलेवर अत्याचार करून महिलेचे मंगळसूत्र घेतल्याची फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाली त्यामुळे आता पोलिस विकास वाघ याच्या मागावर आहेत.
No comments
Post a Comment