Breaking News

1/breakingnews/recent

25 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन

No comments

        News24सह्याद्री कोरोना आणि मृत्यूबाईच्या लग्नाची अनोखी पत्रिका..जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

1. इंधन दरवाढीमुळे भाज्या महागल्या
 देशात  मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने होणाऱ्या  वाढीमुळे आता सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे.  

2. मुंबईसह राज्यात कोरोनाचा फैलाव वाढला
राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस पुन्हा वाढतच चाललाय. आज दिवसभरात तब्बल 8 हजार 807 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 

3. आझम खान यांना योगी सरकारचा दणका
वेगवेगळे वाद, वक्तव्ये आणि आरोपांमुळे कायम वादत असणारे समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूरचे खासदार आझम खान यांना योगा सरकारने मोठा दणका दिला आहे. सरकारने आझम खान यांना लोकतंत्र सेनानी म्हणून मिळणारं पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

4. राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
राज्यातील विविध भागातील शेकडो विद्यार्थांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. वाशिम, सोलापूर, सातारा, लातूर अशा विविध भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.

5. कोरोना रुग्ण वाढत असल्याने मुंबई पालिकेचा मोठा निर्णय

मुंबईत पुन्हा एकदा करोना रुग्ण वाढत असल्याने पालिकेकडून उपाययोजना केल्या जात असून निर्बंधही आणले जात आहेत. गेले दोन दिवस मुंबईतील रुग्णसंख्येत घसरण नोंदवण्यात आली होती. 

6. पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या चित्रा वाघ
पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन भाजपा प्रचंड आक्रमक झाली असून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी पुण्यात घटनास्थळी भेट दिली. पूजा चव्हाण ज्या इमारतीत राहत होती, जिथे तिने आत्महत्या केली त्या इमारतीची चित्रा वाघ यांनी पाहणी केली. 

7. कोरोना आणि मृत्यूबाईच्या लग्नाची अनोखी पत्रिका
लग्नाला चला, तुम्ही लग्नाला चला…कोरोना विषाणू आला हो दारी, तुम्ही आता तरी रहा घरी या म्हणीला साजेस अशा एका लग्नाच्या पत्रिकेची चर्चा सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

8. शिवाजी पार्क प्रकल्पाच्या निविदा रोखण्यासाठी राज ठाकरेंचं पत्र
दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवाजी पार्क) नूतनीकरण प्रकल्पात मनसे उडी घेणार, याचा अंदाज येताच शिवसेनेकडून प्रकल्पासाठी निविदा काढण्याची घाई करण्यात आली आहे. 

9. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आता नागपुरात कठोर नियम लागू
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आता नागपुरात कठोर नियम लागू करण्यात येत आहेत येत्या शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असणार आहेत. 

10. 16 वर्षीय मुलीचे हातपाय बांधून बलात्कार
देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *