Breaking News

1/breakingnews/recent

कोरोना रुग्ण संख्येमध्ये वाढ झाल्यामुळे महापालिकेचा मोठा निर्णय; ‘हे’ प्रसिद्ध मैदान केले बंद

No comments




मुंबई -

राज्यात व मुंबईमध्ये कोरोना संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे मुंबईत कोरोना रुग्ण वाढत असल्याने पालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहे.  निर्बंधही आणले जात आहे. गेले दोन दिवस मुंबईतील रुग्णसंख्येत घसरण नोंदवण्यात आली होती. मात्र, बुधवारी तब्बल १,१६७ मुंबईकरांना कोरोनाची बाधा झाल्याची नोंद होताच यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील प्रसिद्ध मैदानांपैकी एक मैदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेने मुंबईतील प्रसिद्ध मैदानांपैकी एक असणारे ओव्हल मैदाना शुक्रवार म्हणजेच २६ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आदेशापर्यंत या मैदानावर कोणत्याही प्रकारचा खेळ किंवा इतर गोष्टींसाठी परवानगी दिली जाणार नाही. गुरुवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून हे मैदान बंद करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पूर्वकाळजी म्हणून आम्ही मैदान पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 अशी माहिती महापालिकेच्या ए वॉर्डमधील सहाय्यक नगरपालिका आयुक्त चंदा जाधव यांनी दिली आहे. चर्चगेटमध्ये असणाऱ्या ओव्हल मैदानात क्रिकेट. फूटबॉल खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. अगदी ठाणे, कल्याण, अंबरनाथ, विरारपासून तरुण या मैदानावर खेळण्यासाठी येत असतात. याशिवाय जॉगिंग तसंच मॉर्निग वॉकसाठीही गर्दी होत असते. चंदा जाधव यांनी गेल्या आठवड्यात मैदानावर जाऊन पाहणी केली असता कोरोना रुग्ण वाढत असतानाही तेथील गर्दी कमी होत नसल्याचं निदर्शनास आले होते. दरम्यान मुंबई पालिकेने ज्या ठिकाणी गर्दी होत आहे अशा सार्वजनिक ठिकाणांवर निर्बंध आणण्यासंबंधी वॉर्ड स्तरावर निर्णय घेण्यास सांगितले आहे. रुग्णदुपटीचा कालावधी सरासरी २९४ दिवसांवर घसरला आहे. करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी गेल्या २४ तासांमध्ये सुमारे २१ हजार १२३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ३१ लाख ८५ हजार ३३४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जोखमीच्या गटातील सहा हजार ७३ संशयित रुग्णांचा शोध घेण्यात पालिकेला यश आले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *