14 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - पेट्रोल डिझेलच्या दरात सलग सहाव्या दिवशी वाढ...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. मुख्यमंत्र्यांनी क्लिप नीट ऐकाव्या म्हणजे कळेल की कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलीस दबावात आहेत का?असा प्रश्न निर्माण होतोय, असं म्हटलं. त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचा आहे, हे स्पष्ट आहे. पोलिसांनी ते सांगितलं पाहिजे. मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंना या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही.
2. २४ तासांत ३ हजार ६११ करोनाबाधितांची वाढ
राज्यात आज (शनिवार) देखील मागील २४ तासांमध्ये आढळलेल्या नव्या कोरनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे. राज्यभरात ३ हजार ६११ नवे करोनाबाधित वाढले असून, १ हजार ७७३ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालायतून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
3. गाईच्या दूध खरेदी दरात वाढ
राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत निर्णय पुणे येथे पार पडली. राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघाद्वारे केल्या जाणाऱ्या गाईच्या दूध खरेदीमध्ये 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दूध संघाच्या निर्ण्यामुळे गायीच्या दुधाला लिटरमागे 29 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
4. गोपीचंद पडळकरांचा महाराष्ट्रात टीआरपी जास्त
आमदार गोपीचंद पडळकर टीव्हीवर आले की आज हा माणूस कुणाला काय बोलणार हे बघण्यासाठी लोकं टीव्हीसमोर थांबतात. त्यामुळे पडळकर आता मंत्री पदासाठी तुमचाच नंबर आहे. तुम्ही शंभर टक्के मंत्री होणार आहे. कारण गोपीचंद पडळकर यांचा सध्या महाराष्ट्रामध्ये टीआरपी जास्त आहे.
5. मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये उद्या सुरू होणार नाहीत
राज्यातील महाविद्यालये उद्या म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी सुरु होणार आहेत. मात्र मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालय उद्या सुरू होणार नाहीत. महाविद्यालये सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन 22 फेब्रुवारीपर्यत विचार होणार आहे.
6. पाच वर्षाचा चिमुकला जागतिक स्तरावर चमकला
जवळपास 195 देशांच्या राष्ट्रध्वज लक्षात ठेवणे खरचं कठीण आहे. पण ही किमया साधलीय ती अंबरनाथच्या एका पाच वर्षीय चिमुकल्याने. इतकंच नव्हे तर अवघ्यां 1 मिनटं 29 सेकंदात 54 देशांचा राजधान्यांची नावे देखील त्याने सांगितली. सुहृद बोडसच असं या चिमुकल्याचं नाव आहे.
7. कृषिपंपधारकांवर वीज थकबाकी कारवाई कशी?
कृषिपंपांच्या थकबाकी वसुलीसाठी आघाडी सरकारने योजना जाहीर केली असताना त्याची मुदत संपण्याआधीच महावितरणच्या राज्यव्यापी थकबाकी वसुली मोहिमेत कृषिपंपधारकांवरही कारवाई कशी सुरू केली
8. पेट्रोल डिझेलच्या दरात सलग सहाव्या दिवशी वाढ
देशात सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कायम आहे. पेट्रोलच्या दरात 28 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 34 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचे दर 95.19 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर 86.02 रुपयांवर पोहेचले आहेत.
9. मुंबई हायजवळ ‘रोहिणी’ नौकेला भीषण आग
मुंबई हायजवळ ‘रोहिणी’ या नौकेला काल रात्री 8.50 ला मोठी आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे. ही आग इतकी मोठी होती की इंजिन रूमनेही पेट घेतला.
10. 21 पैसे जास्त घेतल्याने औषध विक्रेत्यास 40 हजार रुपयांचा दंड
औषध विक्रेत्याने इंजेक्शन विक्रीत 21 पैसे जास्तीचे आकारल्या प्रकरणी न्यायालयाने तब्बल 14 वर्षानंतर 40 हजार रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
No comments
Post a Comment