जिल्ह्याची खबरबात - प्रकाश कोपरे कुटुंबीयांना आठवले यांची सांत्वनपर भेट
News24सह्याद्री - प्रकाश कोपरे कुटुंबीयांना आठवले यांची सांत्वनपर भेट....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
1. शेवगाव मध्ये भव्य नृत्य स्पर्धा व हळदी कुंकू समारंभ
महिला शक्ती संघ शेवगाव व जनशक्ती विकास आघाडी शेवगाव पाथर्डी आयोजित भव्य नृत्य स्पर्धा व हळदी कुंकू कार्यक्रम आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव येथे संपन्न झाला .
2. प्रकाश कोपरे कुटुंबीयांना आठवले यांची सांत्वनपर भेट
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे आज कोपरगाव येथे कालकथित प्रकाश कोपरे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आले होते. कोपरगाव येथे आज सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
3. गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू वाहतूकीस टाकळी ग्रामस्थांचा विरोध
गेल्या काही दिवसापूर्वी शासनाच्या निर्णयाप्रमाणे सोनारी धारणगाव गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा संदर्भात वाळूचा लिलाव झाला असून सदरची वाळू वाहतूक टाकळी धारणगाव- टाकळी मुर्शतपूर -टाकळी सोनारी या मार्गाने होणार होणार आहे .
4. बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात अंग्निप्रतिरोधक उपकरणे
भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगिच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार खबरदारी म्हणून शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात एकूण चार फायर उपकरणे प्रात्यक्षिकासह माहिती देत बसविण्यात आली. या ग्रामीण रुग्णालयात आज चार फायर उपकरणांसह एक Co2 प्रकारचे उपकरण बसविण्यात आले आहे..
ओडिशातील कंधमाळ येथून महाराष्ट्रातील विविध महानगरांमध्ये गांजाचा पुरवठा करणारी आंतरराज्य टोळी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी उघडकीस आणली. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीतून या टोळीच्या सूत्रधारासह राज्यातील वाहतूकदाराचे नाव समोर आले आहे.
6. कोरोना संकटात सापडला माघी गणेशोत्सव
कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील श्री सिद्धीविनायकाचा यावर्षीचा माघी गणेशोत्सव सोहळा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने सुरू आहे. पालखी सोहळाही रद्द करण्यात आला असून, मंदिर सोमवारी जन्मोत्सव सोहळ्यादरम्यान सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहे.
7. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आमदार रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून एक नाव सतत चर्चेत आहे ते म्हणजे पुजा चव्हाण. या एका नावाने सध्या राज्यात वादळ उठविले आहे. या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येमुळे आता याप्रकरणावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
8. नगर जिल्ह्यांत या तारखेला गारपीट व वादळी पावसाचा अंदाज
राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार 16 ते 18 फेब्रुवारी या दोन दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये दुपारनंतर वादळी पाऊस होऊ शकतो.
9. महादजी शिंदे स्मृतीदिन श्रीगोंदा शहरात साजरा
मराठ्यांच्या इतिहासात अटकेपार झेंडा लावलेले पराक्रमी सेनापती महादजी शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त श्रीगोंदा येथील त्यांच्या स्मारकातील पादुकांची तहसीलदार कार्यालयाच्या वतीने नायब तहसीलदार डॉ योगीता ढोले ,श्रीगोंदा नगरपरिषदेच्या कार्यालय अधिक्षक प्रियंका शिंदे , दिलीपराव पोटे यांचे हस्ते शासकीय पूजा करण्यात आली.
मागील चार वर्षांत विविध योजनांतील घरकुले मंजूर करण्यात नेवासे तालुका नगर जिल्ह्यात अव्वलस्थानी अाहे. आतापर्यंत तालुक्यात ८ हजार ७४० घरकुले मंजूर झाली आहेत.
No comments
Post a Comment