सह्याद्री ब्रेकिंग न्यूज - रेखा जरे हत्याकांड । आरोपींविरोधात पारनेर न्यायालयात चार्जशीट दाखल
News24सह्याद्री -
यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडसंदर्भात आरोपींच्या विरोधात आज पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी हे दोषारोपपत्र दाखल केले. या हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे हा अद्यापही पसारच आहे. हत्याकांड घडवून आणणारे सागर भिंगारदिवे, ज्ञानेश्वर शिंदे, ऋषीकेश पवार, गुड्डू शिंदे, फिरोज शेख हे पाचजण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.
रेखा जरे यांचे हत्याकांड दि. ३० नोव्हेंबर २०२० पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात घडले होते. हत्याकांड घडल्यानंतर पोलिसांनी कमी कालावधीत थेट मारेकरीच पकडले आणि पुढे या हत्याकांडाचा सुत्रधार बाळ बोठे हाच असल्याचे समोर आले. ९० दिवसांच्या आत आरोपींच्या विरोधात चार्जशीट दाखल होणे आवश्यक असते. त्यानुसार बाळ बोठे यास फरार घोषीत करण्यात आले. बाळ बोठे याने अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी सत्र न्यायालय आणि त्यानंतर औरंगाबाद खंडपीठात अर्ज केले. दोन्ही ठिकाणी त्याचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. आता त्याला सुप्रिम कोर्टात जाणे अथवा अटक करून घेणे हे दोनच पर्याय राहिले आहेत. तर पारनेर न्यायालयात दाखल करण्यात आलेले हे जार्चशीट हे २६० पानांचे आहे.
No comments
Post a Comment