12 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - यवतमाळमधील पाटणबोरीलगत वाघाच्या हल्यात दोन जखमी....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. शिवजयंती साधेपणानेच.! गृहविभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
राज्यातील कोरोनाचे संकट अजुनपर्यंत संपलेले नाही, त्याचे परिणाम विविध सार्वजनिक उत्सवांवर होत आहेत. दरवर्षी उत्साहात साजऱ्या हाेणाऱ्या शिवजयंतीवरही यंदा मर्यादांचे बंधन आले आहे.
2. यवतमाळमधील पाटणबोरीलगत वाघाच्या हल्यात दोन जखमी
केळापूर तालुक्यातील पाटणबोरीलगतच्या जुनोनी शेतशिवारात गुरूवारी रात्री जागलीसाठी गेलेल्या दोन व्यक्तीवर वाघाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची माहिती पुढे येत आहे.
3. रिलायन्स-फ्युचर ग्रुप भागीदारी विरोधात ऍमेझॉन आता सर्वोच्च न्यायालयात
ऍमेझॉन आणि फ्युचर ग्रुप यांच्यातील वाद भविष्यात आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहे. रिलायन्स आणि फ्युचर ग्रुपमध्ये झालेल्या सुमारे 24 हजार 713 कोटी रुपयांच्या कराराला आव्हान देण्यासाठी ऍमेझॉनने आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत
4. मनसेसोबत युती नाहीच - फडणवीस
महापालिकेत गेल्या चार वर्षांत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच नगरसेवकांनी चांगले काम केले आहे. या कामाबाबत आपण समाधानी असून अगामी निवडणुकीसाठी आम्हाला कोणताही नवीन मित्र जोडण्याची गरज नाही.
5. वीज तोडणी थांबवण्यासाठी अर्जून खोतकर यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
थकीत वीज बिलापोटी महावितरणकडून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू झाली आहे. गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके जोमात असताना शेतकरी अडचणीत सापडत आहेत.
6. गिरीश महाजनांच्या मतदारसंघात येऊन खडसेंचा इशारा
भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात येऊन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी डरकाळी फोडली आहे. सीडी लावण्याबाबत मी गंमतीने बोललो होतो.
7. सांगली महापौर, उपमहापौरपदाची 23 फेब्रुवारीला निवड
महापालिकेच्या नव्या महापौर व उपमहापौरांची 23 फेब्रुवारी रोजी निवड होणार आहे. विभागीय आयुक्तांनी या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला.
8. धक्कादायक. पुण्यात संशयापोटी नवऱ्याने बायकोला पेटवून दिले
पत्नीवर संशय घेत नवऱ्याने 'तुझे बाहेर कोठेतरी काहीतरी चालू आहे' असे बोलून 30 वर्षीय विवाहितेला पेटवून देत खून करण्याचा प्रयत्न केला.
9. राज्य सरकारचा फ्लिपकार्टसोबत करार
सध्या ऑनलाईन बाजारात वेगाने पुढे जात असलेल्या फ्लिपकार्ट या स्वदेशी कंपनीसोबत महाराष्ट्र सरकारने सामंजस्य करार केला आहे.
10. भारताला मोठा दिलासा, तर इंग्लंडला बसणार मोठा धक्का
भारत आणि इंग्लंडदरम्यान दुसरी कसोटी शनिवारपासून सुरू होईल. या कसोटीच्या आधीच एक मोठी बातमी येत आहे. भारताला दिलासा देणारी तर पाहुण्या संघाला धक्का देणारी ही बातमी आहे.
No comments
Post a Comment