Breaking News

1/breakingnews/recent

कोल्हापुरात कोरोनाचा धोका वाढला, अंबाबाई आणि जोतिबांच्या दर्शनाच्या वेळेत बदल

No comments



मुंबई -

कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अंबाबाई मंदिर आणि जोतिबांच्या  दर्शनाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी दर्शनाची वेळ सकाळी 6 ते रात्री 8 अशी वेळ होती. ती आता 25 फेब्रुवारीपासून सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 8 अशी करण्यात आली आहे. दुपारी 12 ते 3 या काळात ही दोन्ही मंदिरे पूर्णपणे बंद असतील. वेळेत बदल करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय पाळण्याचे जनतेला आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिर या देवस्थानातील दर्शनाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आलाय. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी करु नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

आता नव्या नियमांनुसार अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरात भाविकांना सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 8 या वेळेत दर्शन घेता येणार आहे. तर, दुपारी 12 ते 3 या वेळेत ही दोन्ही मंदिरं पूर्णपणे बंद असणार आहेत. हा निर्णय मंदिर देवस्थान समितीने घेतला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे राज्यात सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. तसेच, अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात दर्शनाची वेळ बदलली असली तरी, दर्शनाला येताना भक्तांनी कोरोना नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार सर्व भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक असेल. तसेच, सोशल डिस्टंन्सिगसह सॅनिटायझरचा वापरही देवस्थान समितीने बंधनकारक केला आहे. त्यामुळे आगामी काळात कोरोनाचा संसर्ग असाच वाढला तर राज्यातील मंदिरं पुन्हा एकदा बंद करण्याची वेळ येते की काय?, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *