Breaking News

1/breakingnews/recent

तापसी करणार ‘टाईम ट्रॅव्हल’; तापसीचा हा दुसरा रहस्यमय सिनेमा टीझर प्रदर्शित

No comments



मुंबई -

आता एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपने त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली. ‘दोबारा’ असे या सिनेमाचे नाव असून तापसी पन्नूची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे तो अनुराग कश्यप आणि तापसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अत्यंत रहस्यमय आणि उत्सुकता ताणणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करत आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरवरुनच हा सिनेमा थ्रीलर असल्याचे लक्षात येते आहे. या ब्रम्हांडाच्या काळचक्रात तुम्ही प्रवास करता तेव्हा काय घडते पहा असे म्हणत अनुराग कश्यपने टीझर शेअर केला आहे. 

टीझरवरुन हा सिनेमा टाईम ट्रॅव्हलवर आधारित असेल याचा अंदाज येतो. या सिनेमाच्या टीझरमध्ये तापसीसोबत अनुराग कश्यपही पाहायला मिळत आहे. तापसी पन्नूच्या खोलीतील टीव्हीत अनुराग अचानक प्रकट होतो आणि तिच्याशी संवाद साधतो. त्यांच्यातील रहस्यपूर्ण संवादावरुनच अनेकांची उत्सुकती ताणली गेली आहे. एकता कपूरनेही या सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. ‘बदला’ या सिनेमानंतर तापसीचा हा दुसरा रहस्यमय सिनेमा आहे. तर रहस्यमय सिनेमा करणे मला कायम आवडते असल्याचे तापसीने म्हंटले.  सप्टेंबर २०२१ मध्ये ‘दोबारा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच तापसीच्या ‘लूप लपेटा’ या सिनेमाचंही पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं असून तेदेखील तिने शेअर केलं आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *