Breaking News

1/breakingnews/recent

कोरोनामुळे अरुण गवळीची प्रकृती गंभीर; उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले

No comments




मुंबई -

कोरोनामुळे अरुण गवळी यांची प्रवृत्ती अत्यंत गंभीर आहे अरुण गवळी याना काही दिवसा पहिले कोरोनाची लागण झाली होती. कुख्यात गुंड अरुण गवळीची प्रकृती खालावली आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीला  काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून अरूण गवळीची प्रकृती सातत्याने खालावत आहे. सध्या गवळीची प्रकृती गंभीर असल्याचे समजले जात आहे. त्यामुळे अरुण गवळीला आता उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अरूण गवळीची प्रकृती खराब झाली होती. तेव्हा तुरुंग अधिकाऱ्यांनी गवळी व इतर कैद्यांची कोरोना चाचणी करवून घेतली.

 त्यामध्ये अरूण गवळीसह पाच कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तुरुंग प्रशासनाने अरूण गवळीसह कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांना वेगळ्या बॅरेकमध्ये ठेवले. गेल्या चार दिवसांपासून अरूण गवळी याच्यावर तुरुंगातील रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. गवळीला दिवसातून तीन वेळा काढा, गरम पाणी व औषधे दिली जात होती. परंतु, या उपचारांचा विशेष फायदा झाला नाही. अखेर आज सकाळी त्याची प्रकृती प्रचंड खालावल्याने गवळीला मेडिकलमधील ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. सध्या याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव अरूण गवळी याच्यावर मेडिकल का कारागृहातील रुग्णालयातच पुढील उपचार करावे, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *