Breaking News

1/breakingnews/recent

हिंमत असेल तर रत्यावर येवून आमच्याशी दोन हात करावेत: निलेश राणेंचा इशारा

No comments




मुंबई -

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सिंधुदूर्गातील दौऱ्यानंतर आता शिवसेना आणि राणे कुटुंबात चांगलीच जुंपली आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी बेहोशीमध्ये खासदार विनायक राऊंतबाबत वक्तव्य केले आहे. आम्ही वाट पहातोय, तुम्ही विनायक राऊतांच्या अंगावर या. आम्ही तुम्हाला शुद्धीवर आणू असा घणाघात शिवसेनेचे रत्नागिरीचे संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांनी केला आहे. भाजप खासदार नारायण राणे यांना मंत्रीपदावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी डिवचले होते. 

“नॉन मॅट्रीक नारायण राणेंना मंत्रीपद हा महाराष्ट्राचा अवमान असेल असे चिमटे त्यांनी काढले होते. या टीकेवरुन नारायण राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार निलेश राणेंनी ट्टिटरवरून विनायक राऊत यांना इशारा दिला होता. निलेश राणेंनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओत त्यांनी “आमच्यावर टिका करताना जी भाषा वापरली जात आहे ती जर बदलली नाही तर दिसाल तिथं फटके घालीन असा इशारा विनायक राऊत यांना दिला होता. त्यानंतर याच मुद्यावरून कोकणात राजकीय ठिणगी पडलीय.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *