Breaking News

1/breakingnews/recent

काँग्रेसने ईव्हीएम बद्दल कधी काय सांगितलं?: अजित पवार

No comments

 


मुंबई - 

अजित पवार यांनी ईव्हीएम बद्दल आपले मत मांडले ते म्हणाले की ईव्हीएमला पर्याय म्हणून मतपत्रिकेचा वापर करण्यासाठी कायदा करण्याची सूचना काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ते विधानसभा अध्यक्ष असताना सरकारला केली होती. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलतान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझा तरी ईव्हीएमवर संपूर्ण विश्वास आहे. असे अजित पवार म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की काँग्रेसने ईव्हीएम बद्दल कधी काय सांगितलं? हे मला तुम्ही अगोदर सांगा. 

काँग्रेसचे नाना पटोले तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष होते विधनासभा अध्यक्ष हे कोणत्याच पक्षाचे राहत नसतात. आता नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले आहे. आता जर त्यांनी काही वक्तव्य केले. तर त्याबद्दल चर्चा होऊ शकते. आमचे असे म्हणणे आहे की ही ईव्हीएम मशीन जेव्हा होती तेव्हा देखील काँग्रेसचे सरकार राजस्थानमध्ये आले आहे. पंजाबमध्ये आले आहे. बऱ्याचदा विविध पक्षाचे कार्यकर्ते काय करतात? चांगले बहुमत मिळाले तर सर्व काही ठीक आहे. आणि जर खूप जास्त मतांच्या फरकाने पराभव झाला.  डिपॉझिट जप्त झाले तर म्हणातात ईव्हीएम मॅनेज केले आहे. मात्र असे काही नाही ईव्हीएम ठीक सुरू आहे, पेपरलेस काम होतं. माझा तरी ईव्हीएमवर संपूर्ण विश्वास आहे. असे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *