गॉसिप कल्ला - साउथ सिनेमा ‘पोगारु’ वादाच्या भोवऱ्यात
News24सह्याद्री - साउथ सिनेमा ‘पोगारु’ वादाच्या भोवऱ्यात.. पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. ‘बिग बॉस’फेम निक्की तांबोळी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?
बिग बॉस 14’ मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली स्पर्धक म्हणजे निक्की तांबोळी. टास्क खेळण्याची पद्धत आणि घरातल्यांसोबत झालेली भांडणं यामुळे निक्की कायम चर्चेत राहिले.
2. साउथ सिनेमा ‘पोगारु’ वादाच्या भोवऱ्यात
साउथ सुपरस्टार ध्रुव सरजाच्या सिनेमासाठी चाहते कायम उत्सुक असतात. ध्रुवच्या अॅक्शन सिनेमांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळते. मात्र यावेळी ध्रुवचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘पोगारु’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
3. तेजश्री प्रधानच्या जागी ‘ही’ नवी अभिनेत्री
मालिकांमधील तोच तोच एकसारखेपणा टाळत ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेने एक नवा प्रयोग छोट्या पडद्यावर केला. विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वीदेखील झाला. त्यामुळेच या मालिकेची आज अफाट लोकप्रियता पाहायला मिळते.
4. ये हमारी पावती कट गई है
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयला विनाहेल्मेट आणि विनामास्क बाईक चालवल्याने मुंबई पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. विवेकला ५०० रुपयांचे ई-चलान मोबाईलवर पाठवण्यात आले. आता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
No comments
Post a Comment