Breaking News

1/breakingnews/recent

‘तान्हाजी’फेम अभिनेत्याचं छोट्या पडद्यावर पदार्पण करणार; ‘या’ मालिकेत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

No comments



मुंबई -

इतिहासात अनेक शूरवीरांच्या कथा आहे. शिवकालीन इतिहासाची पाने चाळली तर अनेक शूरवीराच्या कथा आपल्याला उलगडतील. बाजीप्रभू देशपांडे, तान्हाजी मालुसरे, शिवा काशिद, बाजी पासलकर अशा अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती देत स्वराज्याचं रक्षण केले आहे. त्यामुळेच या शूरवीरांपैकी एक असलेले तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटातून उलगडण्यात आली. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची भूमिका विशेष गाजली. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे धैर्य घोलप. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या धैर्यने आता छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकले आहे.

 या दोन्ही कलाकारांच्या भूमिकांसोबतच धैर्य घोलपची भूमिकाही विशेष गाजली. तान्हाजी मालुसरे यांच्या सैन्यातील एका मावळ्याची भूमिका धैर्यने साकारली होती. यात उदय भान सिंहच्या (सैफ अली खान) हातून त्याचा मृत्यू झाल्याचं दाखण्यात आलं आहे. या चित्रपटानंतर धैर्य लवकरच बावरा दिल या मालिकेत झळकणार आहे. “मला नेहमीच नकारात्मक पात्रांबद्दल आकर्षण वाटतं आलंय. याचे कारण खलनायकी भूमिकांमध्ये भावनांच्या अनेक छटा साकारायला मिळतात. आपल्यातल्या अभिनेत्याचा त्यामुळे कस लागतो, असे मला वाटते. तान्हाजीमधील उदय भान ही भूमिका ओम राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली सैफ सर कशी साकारली होती. हे मला पाहायला मिळालं. त्यांची तयारी बारकाईने न्याहाळायची संधी मला मिळाली. त्याचा फायदा ‘सरकार’ ही भूमिका रंगवताना होत आहे. असं धैर्य म्हणाला.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *