Breaking News

1/breakingnews/recent

हे गाणं ऐकून भारती सिंग डोळ्यात पाणी आलं

No comments

 


मुंबई -

भारती सिंग हे नाव कोणत्याही प्रेक्षकासाठी नवीन नाही. आपल्या सगळ्यांना हसवणारी आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारी भारती सिंग कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. अलिकडेच भारतीने इंडियन आयडॉल १२ च्या मंचावर हजेरी लावली होती. मात्र, नेहमी हसतमुख असणाऱ्या भारतीच्या डोळ्यात यावेळी पाणी तरळल्याचं पाहायला मिळाले. सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरु असल्यामुळे अनेक रिअॅलिटी शो, कार्यक्रम यांमध्ये प्रेमाचे वारे वाहत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक कार्यक्रमांमध्ये व्हॅलेंटाइन स्पेशल भाग रंगताना पाहायला मिळत आहे. यातच इंडियन आयडॉलच्या मंचावरदेखील व्हॅलेंटाइन स्पेशल भागाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया या जोडीने मंचावर हजेरी लावली होती. 

परंतु, भारतीच्या डोळ्यात अचानक पाणी आल्याचे पाहायला मिळाले. व्हॅलेंटाइन स्पेशल भाग असल्यामुळे या कार्यक्रमात स्पर्धकांनी प्रेमगीतं सादर केली. यावेळी जब कोई बात बिगड जाए हे गाणे स्पर्धकांनी म्हणायला सुरुवात केल्यावर हर्ष आणि भारती मंचावर आले आणि त्या गाण्यावर छान ठेका धरला. परंतु, हे गाणं ऐकून भारतीच्या डोळ्यात पाणी आलं. हर्षसारखा नवरा मिळणे हे माझे भाग्य आहे. तो भेटल्यापासून आजपर्यंत खंबीरपणे माझ्या मागे उभा आहे. अगदी माझा पाठीचा कणा असल्यासारखा असे  म्हणत भारतीने हर्षप्रतीचे प्रेम व्यक्त केले आहे. मात्र, त्याच वेळी तिच्या डोळ्यात पाणी आले.  या स्पेशल भागात भारती-हर्षप्रमाणेच गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांनीदेखील हजेरी लावली होती.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *