Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - व्हॅलेंटाईन डे निमित्त जातीयवाद नष्ट करण्याचा संदेश

No comments

   News24सह्याद्री - व्हॅलेंटाईन डे निमित्त जातीयवाद नष्ट करण्याचा संदेश...पहा शहराची खबरबात मध्ये


TOP HEADLINES

1. शहराच्या विस्तारीकरणाला चालना
 शहरीकरणाच्या विस्तारीत भागासाठी नवीन योजना आणण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवा सुरू आहे. भविष्यात नगर शहराचा विकास झालेला पाहायला मिळेल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी  केले.

2.शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीपुरवठा योजनेवरील मुळा पाणी उपसा केंद्रातील विद्युत पंप नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे मुळा धरणातून होणारा पाणी उपसा बंद राहणार असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्क्ळीत झाला आहे.

3. निंबळकचा पाणी प्रश्न सोडविणार
वेळेवर आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित करून निंबळकचा पाणी प्रश्न कायमचा सोडविणार असून येथे विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देणार आहे, अशी ग्वाही आमदार नीलेश लंके यांनी दिली.

4. व्हॅलेंटाईन डे निमित्त जातीयवाद नष्ट करण्याचा संदेश
व्हॅलेंटाईन डे निमित्त जागरूक नागरिक  मंचातर्फे शहरातील पत्रकार चौकातील शहीद भगतसिंग उद्यानात जातीयवाद नष्ट करण्याचा संदेश देण्यात आलाय  मंचाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष मुळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. 

5. दुचाकीसह मोबाईल चोरी
 माळीवाडा बस स्थानका नजीक जिल्हा परिषदेच्या भिंतीजवळ उभी असलेली दुचाकी व त्यावर  ठेवलेली बॅग चोराने लांबविली या घटने बाबत   अशोक शिवाजी  लगड यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर पुढील तपास सुरू आहे
    



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *