Breaking News

1/breakingnews/recent

15 फेब्रुवारी सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

   News24सह्याद्री - घोडेगाव उपविभागात शेतपंपांची २९५ कोटींची थकबाकी...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये 


TOP HEADLINES

1. जिल्हा बँकेच्या संचालकांनी घेतली शरद पवारांची भेट
 जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी पुण्यात भेट घेतली. जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या संचालकांशी चर्चा करत माहिती घेतली. 

2. साईमंदिर परिसरात फुलांची सजावट
साईबाबांच्या निर्वाणानंतर काही वर्षांनी काकासाहेब दीक्षितांच्या पुढाकारातून व संत दासगणू यांच्या अध्यक्षतेखाली साईसंस्थानची स्थापना झाली. १३ फेब्रुवारी, १९२२ रोजी नगरच्या न्यायालयाने संस्थानच्या घटनेला मान्यता दिली. 

3. कर्जतला फिरत्या दवाखान्याचा प्रारंभ
कर्जत-जामखेड मतदारसंघ कॅन्सरमुक्त करण्याचा निर्धार आमदार रोहित पवार यांनी केला आहे. आरोग्य सेवेपासून एकही गरजू वंचित राहणार नाही. यासाठी आता या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून घरपोहोच सुविधा उपलब्ध झाली असून तिचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदा पवार यांनी केले आहे. 

4. नेवाशाचा मोहिनीराज यात्रोत्सव रद्द
शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांची यात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याचे पंच कमिटी व पुजारी बडवे कुटुंबीयांनी जाहीर केले आहे. २० फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही यात्रा जाहीर भागवत कथा, कीर्तन, पालखी सोहळा, काला यासह पाच दिवसांचे गाव जेवण पंगती यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र ..

5. आपल्याला सोडून गेलेल्यांना त्यांची चूक समजली
काही लोक आपल्या संघटनेत होते. काहीतरी गफलत झाल्यामुळे मध्यंतरीच्या काळात ते आपल्यापासून दुरावले होते. मात्र, कालांतराने अविचारी लोकांच्या पाठीमागे राहण्यात अर्थ नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

6. पुन्हा तीन कावळ्यांचा मृत्यू; या गावात बर्ड फ्लूची भिती
जिल्ह्यात काही ठिकाणी बर्ड फ्लूने अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरणे वाढू लागल्याने प्रशासनाने देखील हे प्रकरण गंभीर घेत उपाययोजना सुरु केल्या आहेत. नुकतेच देवळाली प्रवरा येथील सोपान भांड यांच्या वस्तीवर 03 कावळे मृतावस्थेत आढळले.

7. ऊस तोडणी कामगाराची मुलगी ब्राह्मणीतून बेपत्ता
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथून शुक्रवारी रात्री ऊस तोडणी कामगाराची साडेचार वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. ब्राम्हणी-वांबोरी या जुन्या मार्गावर असलेल्या ऊसतोडणी मजुराच्या थळात शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. 
 
8. घोडेगाव उपविभागात शेतपंपांची २९५ कोटींची थकबाकी
महावितरणच्या घोडेगाव उपविभागात शेतपंपांची २९५ कोटींची थकबाकी असून त्यातील १०२ कोटी तातडीने महावितरणकडे भरणे अत्यावश्यक आहे. या विभागात १९ हजार ७६७ शेतीपंप आहेत. 

9. चोरटयांनी दागिन्यांसह शेळ्या चोरून नेल्या
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिंगोरी येथे रविवारी पहाटे दोनच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ठिकाणी घरफोड्या करून रोख रक्कम, दागिने व शेळ्या चोरून नेल्या. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

10. तरुणाचा मृतदेह कालव्यातून वाहत आला
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील प्रवरा डाव्या कालव्यातून एका तरुणाचा मृतदेह वाहून जात असताना नागरिकांना दिसला व तो मृतदेह पोलिसांच्या मदतीने वार्ड नंबर सात मधील अक्षय कॉर्नर च्या परिसरात अडवून बाहेर काढण्यात आला याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *