Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - भरदिवसा चोरी, मोहरीतील महिनाभरातील दुसरा प्रकार

No comments

     News24सह्याद्री - भरदिवसा चोरी, मोहरीतील महिनाभरातील दुसरा प्रकार..पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या 




TOP HEADLINES


1. कोपरगावमध्ये  राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी
कोपरगाव शहरात राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची जयंती परीट समाज आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज युवक संघटनेच्या वतीने गांधी चौक या ठिकाणी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

2. विना मास्क फिरणाऱ्या  155 व्यक्तीं विरुद्ध कारवाई
शेवगाव शहरातील आंबेडकर चौक, क्रांती चौक व नित्यसेवा हॉस्पिटल चौक  येथे विना मास्क फिरीणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

3. भरदिवसा चोरी, मोहरीतील महिनाभरातील दुसरा प्रकार
जामखेड तालुक्यातील मोहरी येथे भरदिवसा घरफोडी होऊन एक लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याठिकाणी घडलेली  ही महिनाभरातील दुसरी घटना आहे. 

4. याहिया पठाणची शुटींग हाॅलीबाॅल महाराष्ट्र संघात निवड
अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या प्रियदर्शनी शाळा अलमगिर मधील   17 वर्षे वयोगटातील शुटींग हाॅलीबाॅल स्पर्धेत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील संघांनी सहभाग घेतला होता यामध्ये अहमदनगर शुटींग हाॅलीबाॅल संघातील खेळाडू याहिया इरफान पठाण यांने उत्कृष्ट खेळ करत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. 

5. सहकारी बॅँकनंतर आता सहकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका होणार
जिल्ह्यात ग्रामपंचायत आणि  जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे वातावरण शांत होते तोच आता जिल्ह्यातील सहकारी सेवा सोसायट्यांचा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. 

6. शिर्डी विमानतळासाठी ५ कोटी ९८ लाखांचा निधी उपलब्ध होणार
 जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या  शिर्डी येथील विमानतळासाठी आता भरीव निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे शिर्डी विमानतळाच्या विकासकामात सुधारणा होण्यास मदत होणार आहे. 

7. कर्जत नगरपंचायतीच्या मतदार यादीवर ८९५ हरकती
कर्जत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी बनविण्याचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार १५ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. यादी बनविण्यासाठी नगर पंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांची नियुक्ती होती.  

8. साडेबारा कोटींचा अंमली पदार्थाचा साठा पकडला
 अकोलेच्या पोलिस निरीक्षक शबाना शेख यांच्या पथकाला नुकतेच मुंबईत अंमली पदार्थ विक्री करणारी व पुरवणारी टोळी पकडण्यात यश आले आहे. 

9. संगमनेरमध्ये ऊसतोड मजूरावर बिबट्याचा हल्ला
अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याचे हल्ले सुरूच आहे असाच एक हल्ला जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील अकलापूर शिवारात झालाय  बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजूर किरकोळ जखमी झाल्याची घटना  घडली. 

10. लॉकडाऊन बाबत खासदार विखे यांचे महत्वाचे विधान
सध्या लॉकडाऊनसंबंधी नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या संदर्भात एक मोठं विधान केले आहे.  आता लॉकडाऊनचा काही उपयोग होणार नाही. लोकांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *