22 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - येरवड्यात टोळक्याने टेम्पोचालकाला लुटले...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. बाणेर.विकासाचा नवा 'पॅटर्न
गेल्या काही वर्षांत पुणे शहराचा विकास अत्यंत वेगाने होत आहे. विशेषत: उपनगरे आणखी विस्तारत आहेत. यात सर्वांना राहण्यायोग्य आणि सुविधांयुक्त परिसर म्हणून बाणेरचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
2. वधू आणि वधूपिताही पॉझिटिव्ह; संपर्कातील वऱ्हाडी गायब
इचलकरंजीतील एका लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नवरीच्या वडिलांना कोरोना झाल्यानंतरही लग्न लावण्यात आलं. सकाळी लग्न झाल्यानंतर संध्याकाळी नवरीही कोरोना पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे लग्नातील वऱ्हाडी मंडळीचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
3. येरवड्यात टोळक्याने टेम्पोचालकाला लुटले
टेम्पोतून उसाचे वाढे घेउन वडगाव धायरीकडे जात असताना 8 ते 9 जणांच्या टोळक्याने चालकाला अडवून मारहाण केली. त्यांच्याकडील तीन हजारांची रोकड, मोबाईल मिळून 25 हजारांचा ऐवज लुटून नेला.
4. राहुल गांधींचा सरकारवर हल्ला
दिल्लीच्या सीमेवर गेल्या अडीच महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागलं. अनेक ठिकाणी पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले.
5. कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर निर्णयाचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे
मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादसह राज्यातील अनेक शहरांत करोना बळावू लागला आहे. अनेक जिल्ह्यात गर्दी टाळण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून, महाविद्यालयांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
6. गलवान संघर्षाबद्दल प्रश्न विचारणाऱ्या तीन पत्रकारांवर कारवाई
पँगाँग टीएसओ सरोवराच्या परिसरातून माघार घेणाऱ्या चीनला मायदेशात अनेक प्रश्नांची उत्तर द्यावी लागत आहेत. गलवान खोऱ्यात १५ जूनला रक्तरंजित संघर्ष झाला होता.
7. केंद्र सरकारची सूचना
महाराष्ट्रासह काही राज्यांत करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना दिल्या असून अद्याप अनेक आरोग्य व आघाडीच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली नसल्याचे म्हटले आहे.
8. सोनम वाँगचूक यांच्या कार्याने उद्धव ठाकरे भारावले
बर्फाच्छादित लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या पर्यावरणपूरक तंबूचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या संशोधक-तंत्रज्ज्ञ सोनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.
9. नवी आकडेवारी भारतीयांच्या चिंतेत भर घालणारी
भारतामध्ये मागील २४ तासांमध्ये करोनाचे १४ हजार १९९ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णसंख्येसोबतच भारतामधील करोनाबाधितांचा एकूण आकडा एक कोटी १० लाखांच्या वर गेलाय. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ झाली
10. फक्त जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहणार
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढत असताना आता बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. बुलडाणा, खामगाव, देऊळगावराजा, मलकापूर आणि चिखलीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
No comments
Post a Comment