Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - ऑस्करच्या शर्यतीत विद्या बालनचा 'नटखट'

No comments

News24सह्याद्री -  ऑस्करच्या शर्यतीत विद्या बालनचा 'नटखट'...पहा गॉसिप कल्ला


TOP HEADLINES


1. ऑस्करच्या शर्यतीत विद्या बालनचा 'नटखट'

अभिनेत्री विद्या बालनच्या 'नटखट' या लघुपटाची सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा वर्णी लागली आहे. 'नटखट'ची निवड २०२१ च्या ऑस्करमध्ये करण्यात आली आहे. याविषयीची माहिती RSVP ने त्यांच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत दिली. हा लघुपट सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा असून समाजात असलेली पितृसत्ताक पद्धती, लिंगभेद, बलात्कार, घरगुती हिंसा आणि महिलांसोबत असलेल्या नात्यांचे पुरुषांकडून करण्यात येणारे वर्गीकरण यासारख्या मुद्द्यांवर हा लघुपट प्रकाश टाकतो. ३३ मिनिटांच्या या शॉर्ट फिल्ममध्ये विद्या महत्वपूर्ण भूमिकेत झळकली आहे. या  लघुपटामुळे मला कलाकार आणि निर्माता अशा दुहेरी भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याची  भावना विद्या बालनने व्यक्त केलीय .


२.सरु आजीमुळे फुटणार डॉ. अजितचं बिंग


अभिनेता किरण गायकवाड याची मुख्य भूमिका असलेली झी मराठीवरील  देवमाणूस ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर पोहोचली असून सरु आजीमुळे डॉ. अजितचं बिंग फुटणार आहे. इतकंच नाही तर आता सरु आजी अजितच्या मार्गातील अडथळा ठरत असल्यामुळे त्याने सरु आजीला संपवण्याचा निर्धार केला आहे.‘देवमाणूस’ या मालिकेत अजितने मंजूच्या जमिनीविषयी अनेक अफवा पसरवल्या आहे. मात्र, या अफवांचा सरु आजीमुळे सुगावा लागणार आहे. 

३.ठाकरे सरकारच्या निर्णयानंतर करिश्माने विकलं घर

करिश्मा कपूरचा कलाविश्वातील वावर आता पूर्वी सारखा राहिलेला नाही. मात्र, तरीदेखील ती या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. त्यातच आता तिने तिचं घर विकलं आहे. विशेष म्हणजे ठाकरे सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे तिला हे घर विकणं सोईस्कर ठरल्याचं म्हटलं जात आहे. ठाकरे सरकारने फ्लॅट मुद्रांक शुल्कात कपात केल्यानंतर करिश्माने हे घर विकल्याचं म्हटलं जात आहे.  म्हणजेच ठाकरे सरकारने  घेतलेल्या या निर्णयाचा  करिष्मा कपूरला फायदाच झाला आहे. 

4. अभिनेता वरुण व नताशा अलिबागमध्ये लग्नगाठ बांधणार 

वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नाची बातमी खरी ठरली आहे. हे दोघं अलिबागमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती आहे. आता लग्न सोहळ्याच्या डिटेल्स समोर आल्या आहे. वरुण आणि नताशाच्या लग्नाच्या कार्यक्रमाची सुरुवात संगीत सोहळ्यानं होणार आहे. वरुणचे जवळचे मित्र करण जोहर, मनीष मल्होत्रा, सारा अली खान, यांसह अनेकजण या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या दोघांच्या लग्नाचे फंक्शन 5 दिवस चालणार असून लग्नसोहळा 22 जानेवारीपासून सुरू होईल आणि 26 जानेवारीपर्यंत चालणार आहे. 

5. प्राची देसाईला व्हीलचेयरवर पाहून चाहत्यांना धक्का

 बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री प्राची देसाईला पाहून चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे.  विमानतळावर  प्राची चक्क व्हीलचेयरवर दिसली. प्राचीच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तिला चालता येत नाही. मात्र, प्राचीला या अवस्थेत पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. या दरम्यान, प्राचीने ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातली होती. प्राचीचे हे व्हीलचेयर वरील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत आणि चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देखील देत आहेत आणि तिच्यासाठी प्रार्थना ही  करत आहेत.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *