शहराची खबरबात - अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन
News24सह्याद्री - अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन...पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
१. भारतवासीयांसाठी आनंदाचा दिवस -आ. संग्राम जगताप
शासनाच्या निर्देशानुसार कोविशिल्ड लसीकरणाचा शुभारंभ करत महापालिकेच्या बुरुडगाव रोड येथील जिजामाता दवाखान्यात अंगणवाडी सेविका ज्योती लवांडे यांना पहिली लस जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत देण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप उपमहापौर मालन ढोणे स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर महिला बालकल्याण समिती सभापती लता शेळके उपसभापती सुवर्ण अप्पा आदी उपस्थित होते. संपूर्ण देशवासीयांच्या शुभकामना यांच्या जोरावर अखेर प्रभावी लस शोधण्यास आपला देश यशस्वी झाला आज सबंध मानवजातीसाठी आनंदाची बाब म्हणजे या विषयांवरील यशस्वी झालेल्या लसीचे प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाले असे प्रतिपादन यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केले
२. कौटुंबिक न्यायालयात स्वच्छता अभियान
अहमदनगर जिल्हा कौटुंबिक न्यायालय येथे अहमदनगर शहर बार असोसिएशन, माहेर फाउंडेशन, नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय महानगरपालिका, जय असोसिएशन ऑफ एनजीओ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत स्वच्छता अभियान राबवून महिला सक्षमीकरणावर व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमास बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट भूषण बऱ्हाटे, ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट भानुदास होले आदी उपस्थित होते. कोरोना महामारीने स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. निरोगी आरोग्यासाठी आंतरिक व बाह्य स्वच्छता महत्त्वाची असल्याचे यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्राजी कंक म्हणाल्या.
३. ऐतिहासिक वस्तु संग्रहालयास मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी भेट दिली.
ऐतिहासिक वस्तु संग्रहालय नुतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या ठिकाणी जिल्हयातून, राज्यातून व देशभरातून पर्यटक येत असतात. त्या दृष्टिने या ऐतिहासिक वस्तु संग्रहालयाचे नुतनीकरणाचे काम अत्याधुनिक पध्दतीने करण्यात येत आहे. नुतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ऐतिहासिक वस्तु संग्रहालय नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक संग्रहालयामुळे नगर शहराच्या नांव लौकिकात भर पडणार आहे.
४. अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी निधी संकलन
अयोध्या येथे जे दिव्य भव्य राम मंदिर तयार होणार आहे त्यासाठी चा निधी संकल कार्यक्रम देश भर सुरू झालेला आहे .अहमदनगर जिल्ह्यात देखील ग्राम दैवत विशाल गणपती येथील मंदिरातून राम मंदिर निधी संकलनाची सुरुवात करण्यात आली. श्री क्षेत्र देवगड देवस्थान चे महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते आणि राम मंदीर निर्माण निधी समिती च्या कार्यकर्त्यांच्या उपस्थित मध्ये नगर शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात सुरुवात करण्यात आली. पाच कोटी, ५ लाख आणि पाच रुपये प्रभू रामचंद्राच्या कार्यकर्त्याला सारखेच असतील. सारखच प्रेम त्यामध्ये असेल असे यावेळी देवगड चे महंत भास्कर गिरी महाराज म्हणाले.
बाईट - भास्करगिरी महाराज
५. रस्त्याच्या बाजूने उभी असलेली बंद वाहनेच ठरतायेत कामात अडथळा
वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने रस्त्याच्या बाजूने आडवीतिडवी वाहने उभी असल्याचे शहरात अनेक ठिकाणी दिसून येते या वाहनांच्या यामुळे वाहतुकीचा बट्ट्याबोळ तर होतोच मात्र नागरिकांनाही त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आता तर रस्त्याच्या बाजूने बंद पडलेली वाहने उभी केली असल्याने रस्त्याच्या कामात अडथळा आल्याने रक्कम महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढले त्यामुळे शहर वाहतूक शाखा अशा अडथळ्यांची दखल घेणार का असा प्रश्न उपस्थित होतोय
No comments
Post a Comment