Breaking News

1/breakingnews/recent

11 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा

No comments

  News24सह्याद्री - शेतकरी आंदोलनाबाबत  सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा






TOP HEADLINES


1. पंतप्रधान मोदींची आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक
 आज दुपारी ४ वाजता पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर ऑनलाईन बैठक घेणार आहेत. या बैठकीत राज्यांमधील करोनाची परिस्थिती व लसीकरण अभियानाची कितपत तयारी झालेली आहे, याचा आढावा घेतला जाणार आहे.  

2. २४ तासांत १९ हजार २९९ जण करोनामुक्त
 देशात २ लाख २२ हजार ५२६ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, आतापर्यंत १ कोटी ९२ हजार ९०९ जणांनी करोनावर मात केली आहे. याशिवाय, १ लाख ५१ हजार १६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.   

3. बढती मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांना योगी सरकारचा दणका
सरकारने अधिकारी पदावरील या कर्मचाऱ्यांचे डिमोशन करुन त्यांना थेट चौकीदार, कारकून, ऑप्रेटर आणि सहाय्यक पदावर नियुक्त केला आहे. यापूर्वीही गैर मार्गाने बढती मिळवल्याचे उघड झाल्यानंतर एका उपविभागीय दंडाधिकाऱ्यावर कारवाई करत त्याला तहसीलदार पदावर नियुक्त करण्यात आलं होतं.

4. Whatsapp-Facebook वर बंदी घाला
 Whatsapp ला नवीन प्रायव्हसी पॉलिसी लागू करण्यापासून रोखावं किंवा Whatsapp वर आणि Whatsapp ची मालकी असलेल्या फेसबुकवर बंदी घालावी, अशी मागणी CAIT ने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र लिहून केली आहे.  

5. 1 मार्चपासून सुरू होणार प्रॅक्टिकल
 31 डिसेंबरला CBSE बोर्डानं परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यानंतर आता परीक्षेच्या दृष्टीनं मुलांसाठी Question बँक तयार करण्याचं काम सुरू आहे.

6. नितेश राणेंना तुरुंगातही टाकणार होते,” - विनायक राऊत 
 माजी मुख्यमंत्री फडणवीस नितेश राणेंना तुरुंगातही टाकणार होते,” असा दावाही त्यांनी राऊत यांनी केला आहे.  

7. शेतकरी आंदोलनाबाबत  सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
 शेतकरी आंदोलक आणि कृषी कायद्यांशी संबंधित सर्व प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू वरिष्ठ वकील प्रशांत भूषण आणि दुष्यंत दवे मांडणार आहे.  

8. परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू
कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. मुंगळीकर यांनी याविषयीची माहिती दिली आहे.  

9. नांदेड जिल्ह्यातील माळेगावची यात्रा कोरोनामुळे रद्द
 जिल्हा प्रशासनाकडून व्यापारी वर्गाला स्टॉल न लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज फक्त देवस्वारी मिरवणूक काढून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूजाअर्चा संपन्न होणार आहे.  

10. मुंबई विमानतळावर ‘आरोग्य सेतू’ची सक्ती
ज्या विमान प्रवाशांना ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप डाऊनलोड करायचे नसेल, त्यांच्यासाठी स्व-घोषणापत्र भरून देण्याचा पर्याय आहे. मात्र, मुंबई विमानतळावरील कर्मचारी  ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सक्ती करीत असल्याचे समोर आले आहे.  

 


 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *