Breaking News

1/breakingnews/recent

1 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा

No comments

    News24सह्याद्री - कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊन देणार नाही - अजित पवार..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. कुठं बंदी तर कुठं जल्लोष, देशभरात नववर्षाचं स्वागत

कोरोना महामारीमुळं देशातील अनेक शहरात नाईट कर्फ्यू होता. मात्र गोवा, पाटणा, भोपाळसारख्या अनेक शहरांत लोकांनी रस्त्यावर उतरुन जल्लोषात स्वागत केल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाच्या नव्या प्रकाराची भारतात एन्ट्री झाल्यानं सरकारनं नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनवर कडक निर्बंध घातले होते.  

2.  शेतकरी आंदोलनाचा 37वा दिवस
नववर्षात 4 जानेवारी रोजी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांत्या प्रतिनिधींमध्ये बैठक होणार आहे. अशातच शेतकरी संघटनांनी 4 जानेवारीपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याची घोषणा केली आहे.

3. फायजर-बायोटेक   लसीच्या आपत्कालिन वापराला WHO कडून मंजुरी
ब्रिटनने ८ डिसेंबरला लसीच्या वापरासाठी सर्वात आधी परवानगी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपिअन युनिअन देशांनीही लसीच्या आपत्कालिन वापराला परवानगी दिली होती.  

4. सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर
शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 4 मे ते 10 जून 2021 या कालावधीत पार पडणार आहेत  

5. केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्लॅन नाही : प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. आज सकाळी त्यांनी कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला आज सकाळी अभिवादन केलं. त्यावेळी ते बोलत होते.

6. कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊन देणार नाही : अजित पवार
 कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊन देणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला आज सकाळी अभिवादन केलं. त्यावेळी ते बोलत होते

7. मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला नव्या वर्षाच्या शुभेच्छा
 आरोग्याची देखील काळजी घेण्याचा संकल्प आपण नव्या वर्षासाठी करूया असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षानिमित्त राज्यातील जनेतला नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

8.  2 जानेवारीला होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन : राजेश टोपे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज याबाबत घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशाप्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

9. मंत्र्याविरोधात ED ची कारवाई

बुधवारी आणि शुक्रवारी ईडीने केलेल्या या कारवाईमध्ये गायत्री प्रजापतींबरोबरच त्यांची मुलं आणि जवळच्या नातेवाईकांच्या घरांवर तसेच कार्यालयांवर छापे मारले. या छाप्यांमध्ये बेकायदेशीर खाण उत्खनन प्रकरणामधील काही धक्कादायक कागदपत्र ईडीच्या हाती लागली आहे. 

10. पतंग विक्रेत्यांकडे नायलॉन मांजाची तपासणी 
वाहनधारकांना अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने नायलॉन मांजावर बंदी आणली. पतंग, मांजा विक्रेते सावध झाले असून बहुतेकांनी आपल्या दुकानांसमोर नायलॉन मांजा विक्रीसाठी नसल्याचे फलक लावले आहेत. महापालिकेच्या पथकांनी काही ठिकाणी विक्रीस ठेवलेले प्लास्टिकचे पतंग जप्त केले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *