Breaking News

1/breakingnews/recent

16 जानेवारी सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24सह्याद्री - व्हाट्सॲपची गोपनीयता धोरणाला तूर्तास स्थगिती...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा


TOP HEADLINES


1. लसीवर कोविड योद्ध्यांचा पहिला हक्क -पंतप्रधान मोदी

गेल्या अनेक महिन्यांपासून देशवासीयांच्या नजरा लागलेल्या करोना लसीच्या वापराला अखेर आजपासून सुरूवात झाली. बहुप्रतीक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी पंतप्रधानांनी देशवासीयांचं अभिनंदन करत संबोधित केलं. पंतप्रधान म्हणाले,”काही वेळात देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू होत आहे. यासाठी मी देशवासीयांचं अभिनंदन करतो. ज्याला सगळ्यात जास्त गरज आहे, त्याला सगळ्यात आधी करोना लस मिळेल,” असं मोदी यांनी स्पष्ट केलं.  

2. अर्णव गोस्वामींच्या विरोधात गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल
रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखेतर्फे अर्णव गोस्वामी आणि बार्क चे सीईओ पार्थो दासगुप्ता यांची व्हॅट्सअ‌ॅप चॅटींग समोर आल्याचं म्हटलंय. गुन्हे शाखेना आपल्या पुरवणी आरोपपत्रात हा खुलासा केला आहे. यावेळी गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यामध्ये संवाद झाला असल्याचं गुन्हे शाखेनं म्हटलंय.
3. व्हाट्सॲपची गोपनीयता धोरणाला तूर्तास स्थगिती 
WhatsApp कडून गोपनीयतेबाबत नवं धोरण आणलं जात असल्याची चर्चा सुरु होताच मोठ्या संख्येनं हे अॅप वापरणाऱ्यांमध्ये मात्र नाराजीची लाट पाहायला मिळाली. काहींनी या धोरणाचं समर्थन केलं, तर काहींनी मात्र त्यावर नकारात्मक सूरही आळवला. युझर्सच्या याच नाराजीनंतर WhatsAppनं एक पाऊल मागे घेत, गोपनीयता धोरणाला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय़ घेतला आहे.
4. आनंदराव अडसूळांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शड्डू ठोकला आहे. किरीट सोमय्या यांनी अडसूळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सिटी सहकारी बँकेच्या घोटाळ्यात आंनदराव अडसूळ यांची भूमिका असल्याचं म्हटलंय. तसेच, त्यांनी बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या एचडीआयएल  या कंपनीकडून देणगी स्वीकारल्याचाही गंभीर आरोप केलाय . या सर्व आरोपांची चौकशी करण्याची विनंती सोमय्या यांनी ईडी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला केली आहे. किरीट सोमय्या यांच्या या मागणीमुळे अडसूळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत.  
5. बहुजन विकास आघाडीला धक्का
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वसई विरारमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु झाल्याचे दिसत आहे. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांचे खंदे समर्थक पंकज देशमुख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ठाकूर कुटुंबासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.  
6. पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार ‘आकाशवाणी’वरुन इंग्रजीचे धडे
कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदा शालेय विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शाळा सुरु नसल्यानं विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठ्या अडचणी येत आहेत. शाळेसह ट्यूशन क्लासेसही बंद आहेत. या विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता आकाशवाणीवरुन इंग्रजीचे धडे दिले जाणार आहेत.  
7. सर्वांसाठी लोकल रेल्वे सेवा चालू करा - मनसे 
महाराष्ट्रात मुंबईतील बीकेसी येथील लसीकरण केंद्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रात कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यातुलनेत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राला ९ लाख ६३ हजार लसी पुरविण्यात आल्या आहेत. राज्याची परिस्थिती पाहता आणखी लसींची मागणी करण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक मागणी केली आहे. राजू पाटील ट्विटरद्वारे म्हणाले की, उद्धव ठाकरेजी आजपासून महाराष्ट्रा सोबतच देशात पण कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळे आता तरी सर्वांसाठी लोकल रेल्वे सेवा चालू करा. नोकरीसाठी मुंबईकडे धावणारा मध्यमवर्ग आपली अर्धी कमाई प्रवासावर खर्च करून व वाहतूक कोंडीत रोज रोज अडकून थकला आहे, असं राजू पाटील यांनी सांगितले.

8. मालेगाव तालुक्यात वाघिणीचा वावर

वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील काशिनाथ बाबा संस्थान परिसरात वाघीण आपल्या तीन पिल्लांसह दिसून आली आहे. गावातील काही नागरिकांनी या वाघिणीला पिल्लासह फिरताना बघितलं आहे. त्यामुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे. दरम्यान वाघिणीचा शोध घेण्यासाठी वनविभाने आपली टीम येथे पाठवली असून वाघीण आणि तिच्या पिलांचा शोध सुरु आहे
9. ठाण्यातील रेशन दुकानांवर कारवाईचा बडगा  
 ठाण्यातील रेशन दुकानांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. रेशनिंग विभागाकडून ठाणे विभागात करण्यात आलेल्या दुकानांच्या तपासणीमध्ये २०१९ पेक्षा २०२०मध्ये दोषी आढळलेल्या दुकानांची संख्या अधिक म्हणजे तब्बल ५६० असल्याची माहिती पुढे आली आहे. किरकोळ, मध्यम आणि गंभीर स्वरूपाचे हे दोष असून काही दुकानांचे परवाने रद्द तर काही निलंबित करण्यात आले आहेत.
10. औरंगाबादमध्ये बॅनरबाजी 
औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या नामांतराचा मुद्दा समोर आला होता. मात्र, या मुद्द्यांवर सरकारमध्येच दोन गट पडले आहेत. शिवसेना नामांतराच्या मुद्द्यावर ठाम आहे तर काँग्रेसनं मात्र विरोध केला आहे. या मुद्द्यावर भाजपनं सरकारवर जोरदार टीकाही केली होती. त्यामुळं नामांतराचा हा वाद अधिकच पेटला आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर झालेच पाहिजे, अशी मागणी करत भाजप युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी लव औरंगाबाद असे फलक लावण्यात आलेल्या भागात नमस्ते संभाजीनगर असे फलक लावले आहेत. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *