Breaking News

1/breakingnews/recent

17 जानेवारी सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

        News24सह्याद्री - बंद घराचे कुलूप तोडून 63 हजारांची चोरी...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा



TOP HEADLINES

1. जिल्ह्यातील मतदान मोजणी प्रक्रिया ‘या’ ठिकाणी पार पडणार
 जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिली आहे.त्यानुसार अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी 8 वाजता तहसील कार्यालय याठिकाणी होईल. संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी 10 वाजता मातोश्री मालपाणी विद्यालय याठिकाणी, कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी 9 वाजता,  

2. ८४%  मतदान शांततेत पार
सकाळी साडेनऊ ते बारा वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.  एकूण ९० हजार ३९२ पैकी विक्रमी ७६ हजार ४७४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.  तर एकूण ८४%  मतदान सर्वच ठिकाणी शांततेत पार पडले.

3.  जिल्हा बँकेत भाजप आणि पॅनल उभे करावे - डॉ. सुजय  विखे पाटील
खासदार डॉक्टर विखे पाटील म्हणाले निवडणुकीचे राजकारण संख्याबळावर चालते जिल्हा बँकेच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी एकत्र आहे भाजपाला संख्याबळावर बँकेत सहज सत्ता  मिळविता येईल असे ते यावेळी म्हणाले

4. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्षासह  70 ते 80 जणांविरोधात गुन्हा
 कर्जत तालुक्यातील पाटेगांव ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून दोघांवर प्राणघातक हल्ला करून मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट कैलास शेवाळे यांच्यासह 70 ते 80 जणांवर कर्जत पोलिसात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय

5. क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी
कोरोणामुळे मागील दहा महिन्यांपासून बंद असलेले कोचिंग क्लास सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन नुकतेच त्यांना निवेदन दिले

6. अवैध दारू विक्री करणाऱ्या नऊ जणांवर गुन्हा
जामखेड तालुक्यातील नान्नज व जवळा परिसरातील अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई गरज 1 लाख 9 हजार 500 26 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यावेळी हॉटेल चालकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

7. बंद घराचे कुलूप तोडून 63 हजारांची चोरी
एकूण 63 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला याप्रकरणी दत्तात्रय रोहम यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

8. मुलाच्या उजव्या कालव्यातून आवर्तन
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून आज सायंकाळी सहा वाजता 551 रब्बी हंगामातील आवर्तन सोडण्यात आलाय  उद्या सकाळी सहा वाजता विसर्ग वाढवून 607 कियुसेक  होईल राहुरी नेवासे पाथर्डी शेवगाव तालुक्यातील बत्तीस हजार हेक्‍टर क्षेत्र यातून ओलिताखाली येणार असल्याचे मुळा पाटबंधारे चे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले
   
9. जिल्ह्यात ८७१ जणांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला  
लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला असूनदिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

10. अपहरण केलेल्या  महिलेचा मृतदेह डोंगराच्या दरीत आढळला
नुकतेच या महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर सदर महिलेचा मृतदेह डोंगराच्या दरीत आढळला आहे.या प्रकरणी दोघा संशयितांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाने तालुक्यात खळबळ माजली आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *