Breaking News

1/breakingnews/recent

चारोळीचे आरोग्यदायी फायदे

No comments
मुंबई -

चारोळी हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. गोडाच्या पदार्थांमध्ये,लाडवांमध्ये चारोळी वापरली जाते. मात्र केवळ गोडाच्या पदार्थांपुरता चारोळी मर्यादीत नाही. अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठीदेखील चारोळीचा नियमित आहारात समावेश करता येऊ शकतो. त्यामध्ये अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत. 

१. आरोग्यवर्धक चारोळी  

चारोळीमध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात. चारोळीत प्रोटीन्स आणि फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. सोबतच यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 2 आणि नियासिन घटक आढळतात. यासोबतच चारोळीत लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात आढळत असल्याने त्याचा आरोग्याला फायदा होतो.  

२. चारोळीचे फायदे 

शारीरिक कमजोरी दूर करण्यास चारोळी मदत करते. शारीरिक वाढीसाठीदेखील त्याचा फायदा होतो. 

३. खोकल्या फायदेशीर 

रात्री दूधात चारोळी मिसळून प्यायल्याने सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो. 

४. तोंडावरचा वासावर फायदेशीर 

तोंड येण्याचा त्रास वारंवार जाणवत असल्यास त्यापासून सुटका मिळवण्यासाठी 3-4 दाणे चघळा.

५ . डोकेदुखी चक्करवर फायदेशीर 

डोकेदुखी, डोकेदुखीतून येणारी चक्कर टाळण्यासाठी चारोळीचे दाणे फायदेशीर होतात. चारोळी तुम्ही थेट खाऊ शकता. याकरिता दूध किंवा पाण्याची गरज नाही. 

६. बद्धकोष्टता उपाय 

बदलती जीवनशैली, धावपळीचे आयुष्य आणि ताणतणाव यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. वेळी-अवेळी खाण्यापिण्याच्या सवयीमुळे काही जण बद्धकोष्ठता तर काही जुलाब होण्याच्या समस्येमुळे त्रासलेले असतात. जुलाब होण्याच्या समस्येमुळे शरीरात अशक्तपणा निर्माण होतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी चारोळीचे सेवन करणं हा रामबाण उपाय आहे.

७. चारोळी आरोग्यवर्धक

आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. कित्येक गोड पदार्थांमध्ये चारोळीचा वापर केला जातो. या छोट्याशा पदार्थामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्त्वांचा साठा असतो. ज्यामुळे आपल्याला भरपूर आरोग्यवर्धक लाभ मिळतात. चारोळीमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी हे घटक आहेत. चारोळीच्या तेलामध्ये अमिनो अ‍ॅसि‍ड आणि स्टीएरिक अ‍ॅसि‍ड ही पोषक तत्त्वही आहेत. पण या ड्रायफ्रुटचे किती प्रमाणात आणि कधी सेवन करावे, याबाबतची योग्य माहिती असणंही आवश्यक आहे.

८. अतिसाराचा त्रास दूर करण्यासाठी लाभदायक

बद्धकोष्ठता प्रमाणेच वारंवार होणाऱ्या अतिसाराचा त्रास देखील चारोळीच्या सेवनामुळे कमी होऊ शकतो. अतिसाराच्या (Diarrhea) समस्येवर चारोळीच्या तेलाचा वापर करणं हा एक प्रभावी उपाय मानले जाते. आहारामध्ये बदल झाल्यास काही जणांना अतिसाराचा त्रास होऊ लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन स्वयंपाकामध्ये चारोळीच्या तेलाचा उपयोग करून पाहा. खिचडी, दलिया, ओट्स इत्यादी पदार्थांमध्ये चारोळीच्या तेलाचा वापर करू शकता. यामुळे अतिसाराची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. अशक्तपणा देखील जाणवणार नाही.

९. ​चारोळीच्या सेवनाचे लाभ

ऑफिसचा ताण, खासगी आयुष्यातील समस्या इत्यादी असंख्य कारणांमुळे आपल्या मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतात. चारोळीचे सेवन केल्याने चिंता, ताणतणाव कमी होण्यासही मदत मिळते, असे म्हणतात. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही आपल्या आहारामध्ये चारोळीचा समावेश करू शकता. चारोळी मिक्सरमध्ये वाटून बारीक पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट दुधामध्ये मिक्स करून प्या. ओट्स, दलिया, खीर किंवा

१०. जीवनसत्त्वांचा खजिना

चारोळीमध्ये व्हिटॅमिन बी१, व्हिटॅमिन बी २ आणि व्हिटॅमिन सी यासारख्या पोषक घटकांचा साठा आहे. या जीवनसत्त्वांमुळे आपल्या शरीराच्या मज्जातंतू मजबूत होण्यास, रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास तसंच रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते. चारोळीतील औषधी घटकामुळे मधुमेहाचा त्रास नियंत्रणात आणण्यास मदत मिळू शकते.

११. ​चारोळीचे अन्य फायदे

कित्येक प्रकारच्या मिठाईमध्ये चारोळीचा आवर्जून वापर केला जातो. विशेषतः वेगवेगळ्या खीर रेसिपीमध्ये चारोळीचा महत्त्वाच्या सामग्रीत समावेश असतो. तसंच चारोळीच्या तेलाचा स्वयंपाकामध्येही उपयोग केला जातो.

१२. चारोळीच्या 'बी'चे उपयोग

चारोळीचा वापर मुख्यत्वे बासुंदी, आईस्क्रीम, पेढे, बर्फी, श्रीखंड, खीर व इतर मिठाईच्या पदार्थांत करतात. काजू + बदाम + खारीक + गोडंबी + चारोळी + खडीसाखर यांचे मिश्रण करून पौष्टिक सुकामेवा तयार करतात. झाडाच्या सालीपासून डिंक व टॅनिन मिळते. चारोळीच्या पानांपासून गुरांना चारा उपलब्ध होतो. चारोळीच्या 'बी'पासून तेल निघते. त्या तेलामुळे केस काळे होतात.No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *