Breaking News

1/breakingnews/recent

5 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

  News24सह्याद्री - दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना मोफत लस : राजेश टोपे....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. जालण्यात आज मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन 

 मराठा आरक्षण मराठा समाजाला मिळू न द्यावे आणि पुरावे सादर करून मजबुती माझे मंडळी राज्य सरकारने चालढकल न करता आरक्षण विषय गांभीर्याने घ्यावा तसेच केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अध्यादेश काढावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे

2. आता गुजराती भाषिकांचा मेळावा
कारण त्यांची बिचाऱ्यांची भूमिका बदलली. हा संगतीचा परिणाम आहे. कदाचित अन्य पक्षाच्या सोबत राहिल्यावर त्यांची भूमिका बदलली असेल”, असा चिमटा भाजप नेते रावसाहेब दानवे   यांनी लगावलाय

3. किसान विकास मंचाचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा  
शेतकरी हे दिल्लीसाठी अकोल्यातील अशोक वाटिका येथून आज रवाना झालेत.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मंच चे अविनाश देशमुख, विवेक पारस्कर व इतर पदाधिकारी व कांग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतेय.यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करीत केंद्र सरकारने केलेल्या कायद्याचा विरोध केलाय.

4. धोनीच्या शेतातील भाजीपाला विक्रीसाठी दुबईला
भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आता त्यांच्या रांचीजवळील शेतात लक्ष घातले असून त्याने पिकवलेला सेंद्रीय शेतीमाल संयुक्त अरब अमिरातीत पाठवण्यात येणार आहे.तर  हा शेतमाल आखाती देशांमध्ये पाठवण्याची जबाबदारी झारखंड कृषी खात्याने घेतली आहे.

5. राहुल गांधी पुन्हा होऊ शकतात काँग्रेसाध्यक्ष
भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि पदाधिकारीही उपस्थित होते. 5 तासहून अधिक वेळ चालली बैठक सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 10 जनपथ येथे जवळपास 5 तासहून अधिक वेळ ही बैठक चालली. यावेळी उपस्थित सर्व नेते मंडळींनी आपापले विचार व्यक्त केले. तसेच या बैठकीत, राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसाध्यक्षपदाची धुरा सांभाळावी, अशी मागणीही करण्यात आली.

6. पुण्यात गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद
शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (७ जानेवारी) बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (८ जानेवारी) सकाळी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

7. अनाथ उमेदवारांना राज्य शासनाचा मोठा दिलासा  
महिला व बालविकास मंत्री Adv. यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात प्रशासनाला गतिमान कार्यवाहीचे निर्देश दिले होते.

8. केरळमध्ये राज्य आपत्तीची घोषणा
देशातील अनेक राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल, झारखंड आणि केरळमध्येही बर्ड फ्लूचं थैमान माजलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे तर केरळने या राज्य आपत्ती जाहीर केली आहे.

9. दारिद्रयरेषेखालील नागरिकांना मोफत लस : राजेश टोपे
दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना कोरोना लसीसाठी ५०० रुपये खर्च करणे अवघड असून त्यांना ही लस मोफत मिळावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. या बाबतीत केंद्राने वेळीच निर्णय घेतला नाही तर राज्य सरकार त्यासंबंधी निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.

10. मेगाभरती करा, नाहीतर मेगा आंदोलन करू
राज्य सरकारने लवकरात लवकर मेगाभरतीची प्रक्रिया सुरु करावी. अन्यथा ओबीसी समाजाकडून मेगा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला. त्यासाठी येत्या 20 तारखेला ओबीसी समाजाकडून राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.    


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *