Breaking News

1/breakingnews/recent

4 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

 News24सह्याद्री - डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऑडिओ टेपमुळे राजकीय भूकंप....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा




TOP HEADLINES

1. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऑडिओ टेपमुळे राजकीय भूकंप 
निवडणुकीचे निकाल बदलण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचे या टेपमधील संभाषणावरून दिसून येत आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्यावर आरोप होत असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या प्रकरणाची तुलना वॉटरगेट प्रकरणाशी करण्यात येत आहे  

2. छोटा राजनला सत्र न्यायालयाने दिला दणका  
छोटा राजन याच्याविरोधात पनवेलमधील नंदू वाजेकर नावाच्या बिल्डरला खंडणीसाठी धमकावण्याचा आरोप होता. असा दावा केला जात होता की, राजन यांनी वाजेकर यांच्याकडून २६ कोटी रुपये हडप करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र छोटा राजनला अन्य तिघांसह सत्र न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे

3. कोरोनामुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशन रद्द  
राज्याच्या निधी वाटपाचे काम नागपुरातील अधिवेशनातून झालं तर चांगलं. तसेच राज्य सरकारच्या 12-13 विभागाची मुख्यालयं पुण्यात आहेत. आता जर मुख्यालय आलं तर नागपूरात यावं  

4. मनसे युतीवर चंद्रकांत पाटील यांचे मोठे वक्तव्य
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या चर्चांना पूर्णविराम लागला आहे तोपर्यंत म्हणजे परप्रांतीय याबद्दलची भूमिका बदलत नाही तोपर्यंत त्यांच्या सोबत कृतीचा प्रश्नच येत नाही असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे

5. ठाणे वाहतूक पोलिसांकडून विक्रमी कामगिरी  
पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत पहिल्याच महिन्यांत तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांच्या दंडाचा भरणा झाला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघनाच्या ९६ हजार ८२ प्रकरणांमधिल दंड वाहनचालकांनी भरला आहे.

6. राज्यात ६ जून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होणार  
दिवसहा शिवस्वराज्यदिन  म्हणून संपूर्ण राज्यात साजरा केला जाणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली

7. वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल
चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी वर्षा राऊत यांनी केली होती. तेव्हा ईडीने वर्षा राऊत यांना ५ जानेवारी रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना दिली होती. दरम्यान, वर्षा राऊत या एक दिवस आधीच ईडीसमोरच चौकशीसाठी उपस्थित राहिल्या आहेत.

8. खांदेश्वर रेल्वे स्थानका जवळील गृहप्रकल्पाला विरोध-प्रशांत पाटील
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या गृहप्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. प्रशांत पाटील यांनी आज प्रस्तावित प्रकल्पाच्या नियोजित जागेची पाहणी केली. यावेळी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यांनतर त्यांनी ही भूमिका मांडली.

9. महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी 'महिला उद्योजकता कक्ष'
 महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमध्ये स्वतंत्र 'महिला उद्योजकता कक्ष' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमधील 30 टक्के निधी महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.  

10. धावत्या एसटी बसमध्येच प्रवाशाने केले विष प्राशन
अंदाजे 50 वर्ष वयाचा एक अनोळखी इसम गेवराईहून अंबड जाण्यासाठी एसटी बसमध्ये बसला. बस अंबड जवळ पोचत असताना बसमध्ये दुर्गंधी येत असल्याची व एक प्रवाशी गंभीर असल्याचे प्रवाश्यांनी चालक आणि वाहकांच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा त्या प्रवाशाने विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला असल्याचं समजताच बसमध्ये एकच खळबळ उडाली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *