3 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट
TOP HEADLINES
1. कोरोना लसीबाबतच्या निर्णयाचे WHO कडून स्वागत
सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे.
2. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमधून चिनी कंपन्यांना बाहेरचा रस्ता
प्रतिक्रिया देत चीननं प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. यामुळे चीन आणि अमेरिकेदरम्यान तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
3. देशात यंदा गहूसह इतर रबी पिकांच्या रेकॉर्ड ब्रेक होणार
यावेळी त्याहून जास्त उत्पादन होऊन नवा विक्रम प्रस्थापित होईल, असा विश्वास तोमर यांनी व्यक्त केला आहे. २०२०-२१ या कृषी वर्षात केंद्र सरकारने एकूण ३०.१ कोटी टन इतक्या उत्पादनाचं लक्ष्य ठेवलं आहे. यात रबी हंगामातून १५.१६ कोटी टन इतकं उत्पादनाची अपेक्षा आहे.
4. कारखान्यांना थकहमीस सरकारचा नकार
साखर कारखान्यांना कर्जासाठी शासन हमी देण्याचा राज्य सहकारी बँकेचा प्रस्ताव राज्य सरकारने फेटाळून लावल्याने कारखान्यांची डोके दुखी वाढली आहे.
5. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री यांचे अभिवादन
सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले
6. बसमध्ये सुरू होता धक्कादायक प्रकार
चालकाने ते खोके फोडून पाहिले असता, त्यामध्ये चांदी असल्याचे आढळून आले. यानंतर चालकाने बस थेट अमरावती पोलीस आयुक्तालयामध्ये आणली.पुढील कारवाईसाठी ही बस फ्रेजारपुरा पोलीस ठाण्यात पाठवण्यात आली आहे आणि पापड्स सुरू आहे
7. कापसाने भरलेला ट्रक पैनगंगा नदीत कोसळला
हदगाव जवळच्या मार्लेगावानजिकच्या पुलावरून हा ट्रक नदीपात्रात पडला आहे. या घटनेत आतापर्यंत एकाचा मृतदेह सापडला असून ट्रक चालकासह अन्य एक जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
8. 'फुले वाड्याच्या सर्वांगीण विकासासाठीसरकार कटिबद्ध'
महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील फुले वाड्याचा सर्वांगीण विकास करून या ऐतिहासिक वाड्याला जतन करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
9. सिंधुदुर्गात नितेश राणेंचा शिवसेनेला पुन्हा धक्का
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत मात्र निवडणुकीआधीच वैभववाडीत राजकारण तापू लागलं आहे. वैभववाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या 103 जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यातील 28 ग्रामपंचायत सदस्य राणेंच्या पुढाकाराने बिनविरोध निवडून आले आहेत.
10. 'दादां'च्या तब्येतीत सुधारणा
गांगुलीला शनिवारी 2 जानेवारीला ह्रदय विकाराचा सौम्य झटका आला होता. यानंतर गांगुलीला कोलकातामधील वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान यानंतर गांगुलीवर अॅंजियोप्लास्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान अनेक ब्लॉकेज काढण्यात आले आहेत
No comments
Post a Comment