जिल्ह्याची खबरबात - वाहन चालविताना मोबाईलवर बोलणारे वाढले
News24सह्याद्री - वाहन चालविताना मोबाईलवर बोलणारे वाढले..पहा जिल्ह्याची खबरबात
TOP HEADLINES
1. रेडिअम रिफलेकटर फलकाचे वाटप
अमृत केनचे मॅनेजर जी. बी .शिंदे अमृत संजीवनी चे एमडी बापूसाहेब शिंदे केशवराव होन शिंगणापूरचे पोलिस पाटील व सरपंच तसेच अमृत संजीवनी चे कर्मचारी या वेळी उपस्थित होते
2. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणारे वाढले
वाहतूक शाखेने वर्षभरात तीन हजार 591 जणांवर कारवाई करत सात लाख 14 हजार सहाशे रुपयांचा दंड ठोठावला दंडात्मक कारवाई होत असली तरी त्यांची ही सवय जाता जात नाही रस्ता क्रॉस करताना महामार्गावरून जाताना अनेक दुचाकी चालक अथवा मोठे वाहन चालविणारे मोबाईलचा उपयोग करताना दिसत आहेत
3. राहुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात
केला
प्रवेश
राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष अमृत धुमाळ यांच्यासह रामदास पाटील विचार मंचच्या राहुरी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला संगमनेर येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला
4. एक हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट मध्ये 39 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत शेचाळीस आणि अँटीजेनने चाचणी १४ रुग्ण बाधित आढळलेत आढळले
5. साईबाबांच्या शिर्डीत वादाची ठिणगी
नवीन वर्षाची सुरुवात साईदर्शनाने करण्यासाठी गेलेल्या शिर्डीच्या नगराध्यक्षांसह गावकऱ्यांना मुख्य अधिकाऱ्याना बाहेर काढल्याने शिर्डी ग्रामस्थ आणि साई संस्थानमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
6. समाजात तेढ निर्माण करणाऱ्यावर कारवाई करा
रिपापब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अजय साळवे यांनी तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी केली आहे
7. प्रवारा नदीवरील पुलाच्या कामाला हिरवा कंदील
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव कोल्हार ते अहमदनगर रस्त्यावरील कोल्हार गावाजवळील परवरा नदीवरील पुलाचे काम चार टप्प्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचं कळतंय लवकरच पुलाच काम सुरू होणार असल तरी अद्यापही ग्रामस्थांना प्रत्यक्ष पुलाच्या कामाची प्रतीक्षा आहे
8. महालादेवी गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध
बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर सर्व नूतन सदस्यांची वाजत गाजत मिरवणूकही काढण्यात आली तर या बिनविरोध ग्रामपंचायतीला राष्ट्रवादीचे आमदार डॉ किरण लहामटे यांच्या कडून गावाच्या विकासासाठी २६ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे
9. निवडणुकीमुळे मिरजगाव तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले
आमदार रोहित पवार यांनी आपली ताकद पणाला लावली आहे एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी करण्यात आले आहे तर अनेक ठिकाणी बिनविरोध साठी प्रयत्न झाले होते मात्र ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली नाही त्या ठिकाणी निवडणूक दुरंगी किंवा तिरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे
10. भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ
नगरपालिकेने भाजी मार्केट बंद ठेवण्यामळे भाजी विक्रेतनवर उअपस्मारीची वेळ आली असून काही भाजी विक्रेते कोरोना मुले मृत पावले आहे त्यांच्या समोर या व्यवसायाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे नगर पालिका प्रशासनाने लवकरात लवकर भाजी मंडई चालू करावी अशी मागणी भाजी विक्रेत्यानंसह काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे
No comments
Post a Comment