Breaking News

1/breakingnews/recent

1 डिसेंबर सह्याद्री सुपरफास्ट

No comments

    News24सह्याद्री - वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीवर जोरदार टिका...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. जनता बाजार व्यावसायिकांचे साखळी उपोषण सुरु  

जनता भाजी बाजारामध्ये अनेक वर्षांपासून भाजी अडते आणि ठोक भाजी विक्रेते व्यवसाय करीत आलेले आहेत. याबाबत जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कारवाई झालेली नसल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण भाजी अडते दुकानदार आणि ठोक भाजी व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे.

2.  निसर्ग रम्य असलेल्या चांदपूर येथे भाविकांची मोठी गर्दी   
नववर्षात पर्यटन स्थळी नागरिक सहपरिवार जाऊन निसर्गाचा सानिद्यात नवीन वर्ष साजरा करत असतात.  नवीन वर्षाची सुरुवात हि भगवंताच्या दर्शन व पर्यटन असं दोन्ही एकाच ठिकाणी होत असल्याने लोकांनी चांदपूर हे ठिकाण निवडलं असल्याचे पर्यटकांनी सांगितले आहे,  

 3. वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीवर जोरदार टिका  
  सरकार जाणून-बुजून या समाजावर अन्याय अत्याचार आसा आरोप सचिन कांबळे यांनी केला सचिन काबळे पुढेही बोलताना म्हणाले आवाज दाब्याचा प्रयत्न करत आहे हा दाब्याचा जास्त वेळ टिकनार नाही आसे वंचित बहुन आघाडीचे सचिन कांबळे यांनी सागितले

 4. जिल्ह्यात तीव्र आंदोलन केले जाईल  भाजपा अध्यक्ष यांचा इशारा 
 जिल्हा भाजपा अध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा व शेतकरी शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर व निवासी जिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना तक्रार व निवेदनाद्वारे केली आहेय.

 5. अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  'शिदोरी खावो'   आंदोलन 
  शेतकऱ्यांनी या केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात नाराजी व्यक्त केली त्यामुळे शेतकरी जागर मंचने हा कायदा रद्द करावा, या मागणीसाठी अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज 'शिदोरी खावो' असे अनोखे आंदोलनकरण्यात आलाय .

6. सियाचिनवर तिरंगा फडकावणारे कर्नल नरेंद्र 'बुल' याचं निधन
जगातील सर्वात उंच भाग असलेल्या सियाचिन ग्लेशिअरवर भारताची स्थिती मजबूत करत तिरंगा फडकावणारे कर्नल नरेंद्र 'बुल' कुमार यांचं गुरूवारी निधन जालं. ते ८७ वर्षांचे होते. लष्कराकडून याबाबत माहिती देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्करानं नरेंद्र बुल यांना श्रद्धांजली वाहिली.  

7. राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांची चर्चा
वृत्तकथा यांच्या प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी केले आहे.

8. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारला मोठी खुशखबर
 कारण, डिसेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा करातून सरकारला विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. डिसेंबरमधील महसूल हा 2020 मध्ये जीएसटीच्या माध्यमातून मिळालेले सर्वाधिक उत्पन्न आहे.  

9. 2021 मध्ये अर्थव्यवस्था सुधारण्याचे संकेत
 2021 मध्ये रिकव्हरीबाबत सकारात्मक आउटलुक आणि सरकार द्वारे योजनांवर अधिक खर्च केला जात असल्याने जाणकारांच्या मते इंडस्ट्रियल सेक्टरप्रमाणेच कंझम्पशन सेक्टर देखील चांगले प्रदर्शन करण्याची शक्यता आहे  

10. लतादीदींनी पंतप्रधान मोदींना दिल्या नववर्षाच्या खास शुभेच्छा
नववर्षाचं स्वागत सगळीकडे मोठ्या उत्साहात सुरू आहे. सामान्य माणसांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेच एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छादेत आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर  यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना खास शुभेच्छा दिल्या आहेत.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *