Breaking News

1/breakingnews/recent

स्पेशल रिपोर्ट - अण्णा हजारे करणार भाजप नेत्यांची पोल खोल

No comments

                News24सह्याद्री - अण्णा हजारे करणार भाजप नेत्यांची पोल खोल...पहा सह्याद्री special रिपोर्ट
मागील लोकसभा निवडणुकी मध्ये राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका करताना एक नवीन फंडा वापरला होता तो म्हणजे केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या होत्या त्या घोषणांचा व्हिडीओ चालवून त्या घोषांचे पुढे काय झाले हे सत्य ते सभे मध्ये मांडत होते त्यांचा हा फंडा म्हणजेच लाव रे तो व्हिडीओ चांगलाच लोकप्रिय झाला होता त्या नांतर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ने हा फंडा वापरून निवडणूक लढवली होती  जे पक्षच सरकार असते ते जनतेला काय आश्वासन देतात आणि त्याची पूर्तता झाली का?  हा संदेश या व्हिडिओतून पाहायला मिळत होता..  आता हाच लाव रे तो व्हिडीओ चा फंडा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे वापरणार आहेत.. फेब्रुवारी २०१९ मध्ये अण्णा हजर यांनी  लोकपाल लोकायुक्त नियुक्ती आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव या मागणांसाठी उपोषण केले होते, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मध्यस्थी नंतर अन्न हजारे यांनी उपोषण सोडले होते 

त्या नंतर अण्णा हजर यांनी मोदी सरकारला अनेक पत्र पाठवले मात्र मोदी सरकार कडून अण्णा हजारे याना कोणतेच उत्तर मिळाले नाहीत अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलनाला परवानगी मिळण्यासंबंधी केलेल्या पत्रव्यवहाराला हि कोणतेही उत्तर आले नाही. त्यामुळे परवानगी मिळत नसल्याचे गृहीत धरून ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथेच यादवबाबा मंदिरात उपोषण करण्याचा निर्णय हजारे यांनी घेतला आहे. यासंबंधी त्यांनी राज्य सरकारला कळविले असून भाजपच्या नेत्यांचा खोटेपणा उघड करणारा एक व्हिडिओही जारी केला आहे.अण्णा आता मोदी सरकारला जाब विचरणायसाठी मैदानात उतरणार असून  लोकपाल लोकायुक्त नियुक्ती आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव या मागणांसाठी अण्णा पुन्हा एकदा उपोषण सुरु करणार आहेत जर मोदी सरकार कडून कोणी मध्यस्ती साठी आले तर अन्न प्रथम लावा तो व्हिडीओ म्हणून सरकारचा खोटेपणा उघड करणार आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *