Breaking News

1/breakingnews/recent



मुंबई -

हळदीला आयुर्वेदामध्ये भरपूर महत्त्व आहे. कारण यामध्ये कित्येक प्रकारच्या औषधी गुणधर्मांचा साठा आहे. जेवणाची चव वाढण्यासाठी हळदीचा  आवर्जून वापर केला जातो. जेवणाव्यतिरिक्त महिलावर्ग आजही त्वचेच्या देखभालीसाठी हळदीचा वापर करतात. मुरुम, डाग, ब्लॅक हेड, काळवंडलेली त्वचा या समस्यांवर हळद हा रामबाण उपाय आहे. नितळ, चमकदार त्वचेसाठी आपण काय नाही करत? बाजारातील विविध महागडे प्रॉडक्ट्स वापरतो. पण सौंदर्याचे काही उपाय आपल्याला स्वयंपाकघरात सापडतात. त्यातील एक परिणामकारक उपाय म्हणजे हळद. बहुगुणी हळद आरोग्यदायी असण्याबरोबरच सौंदर्यवर्धकही आहे. हळद त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

 विविध पदार्थांमध्ये हळद मिक्स करुन बनवलेले पॅक त्वचेसाठी उत्तम ठरतात. तर पाहुया त्वचा नितळ, सुंदर करण्यासाठी हळद कशी वापरावी बहुतांश ब्युटी प्रोडक्टमध्येही हळदीचा समावेश केला जातो. या औषधी वनस्पतीमध्ये अँटी बॅक्टेरिअल चे गुणधर्म आहेत. यामुळे त्वचेवरील सीबमचा अधिक प्रमाणात होणारा स्त्राव कमी होण्यास मदत मिळते. ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांचा त्रास कमी होतो. महत्त्वाचे म्हणजे हळदीच्या वापरामुळे चेहरा सतेज होतो. मुरुम कमी करण्यासाठी हळदीचा वापर कसा करावा, जाणून घेऊया याची सविस्तर माहिती ​मुरुम येण्यामागील कारण शरीरातील हार्मोनमध्ये होणारे बदल, जंक फूडचे सेवन,अनुवांशिक कारण, प्रदूषण तसंच केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्टच्या अतिरिक्त वापरामुळे त्वचेचं नुकसान होते. त्वचेवरील मृत पेशींमुळेही मुरुम येतात.

१. हळदीचा वापर कसा करावा?

हळदीचा चहा तुम्हाला सहजरित्या बाजारामध्ये मिळेल. नेहमी ऑर्गेनिक चहा पिण्यावर भर द्यावा. यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात. चेहऱ्यावर तेज येण्यास मदत मिळते. हळदीचा चहा प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरुम कमी होतात.

२. ​हळद फेस पॅक

हळद ( Turmeric and acne) अँटी सेप्टिक प्रमाणे काम करते. यातील गुणधर्म सूक्ष्म जीवजंतूंविरोधात लढतात. हळद फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील बॅक्टेरिया देखील कमी होतील. तीन चमचे दही, मध आणि अर्धा चमचा हळद एकत्र घ्या आणि त्याची जाडसर पेस्ट तयार करा. हे मास्क अर्धा तासासाठी चेहऱ्यावर लावा. यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. या फेस मास्कमुळे चेहऱ्यावरील मुरुम आणि डाग कमी होतील.

३. ​हळद आणि लिंबू रस फेस पॅक

लिंबूमध्ये अँटी सेप्टिक आणि अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत. यामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत मिळते. हळद आणि लिंबू रस एकत्र घ्या. जाडसर पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा. पेस्ट सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या.

४. सुरकुत्यांसाठी उपाय

वाढत्या वयोमानानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात. पण हळदीचा फेस पॅक वापरून तुम्ही हा त्रास दूर करू शकता. दूध किंवा दह्यामध्ये हळद मिक्स करा आणि हा लेप १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. हलक्या हातानं मसाज करा. पेस्ट सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या.

५. ​हळदयुक्त साबण

त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हळदयुक्त साबणाचा वापर करणं फायदेशीर ठरेल. सकाळी आणि संध्याकाळी हळद असलेल्या साबणाने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. आपल्या चेहऱ्याची त्वचा नाजूक असते. त्यामुळे अति प्रमाणात केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्टचा त्यावर भडीमार करू नये. यामुळे त्वचेचा रंग तसंच पोत बिघडण्याची शक्यता असते. संवेदनशील त्वचा असणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय चेहऱ्यावर कोणतेही उपाय करणं टाळावे.

६. ​हळदीचे करा सेवन

चेहरा सतेज दिसण्यासाठी तुम्ही नियमित हळदीच्या पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे केवळ त्वचेलाच नाही तर संपूर्ण शरीरालाही फायदे मिळतील. आरोग्य तज्ज्ञांनुसार,आपण दररोज 400 से 600 मिलीग्रॅम हळदीचे सेवन केले पाहिजे. हळदीमुळे शरीर डिटॉक्स होते. शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होत नाही. यामुळे वजन वाढीचीही समस्या निर्माण होत नाही.

७. ​हळदीचे दूध

शिवाय तुम्ही नियमित हळदीच्या दुधाचेही सेवन करू शकता. यामुळे आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक लाभ तुम्हाला मिळतील. भरपूर औषधी गुणधर्माचा साठा असल्याने तुम्ही आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये हळदीचा समावेश करू शकता.

८.बेसन आणि हळद स्क्रब 

बेसन आणि हळद एकत्र करुन तुम्ही त्याचा स्क्रबप्रमाणे वापर करु शकता. त्यामुळे त्वचा उजळ आणि मुलायम होईल.

९. हळदीमुळे त्वचा उजळते

लिंबाच्या रसात ब्लिचिंगचे गुणधर्म असतात. तर हळदीमुळे त्वचा उजळते. त्यामुळे हळदीत लिंबाचा रस मिक्स करुन त्वचेवर लावा. त्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होऊन त्वचेचा पोत सुधारेल.

१०. हळदीच्या  दुधाचे फायदे 

हळदीत दूध घालून चेहऱ्यावर लावल्यास फ्री रेडिकल्स कमी होतात. त्यासाठी हळदीत कच्चे दूध घालून मिश्रण बनवा आणि ते चेहऱ्यावर, मानेवर लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. नंतर त्वचेत झालेला बदल स्वतः अनुभवा.

11. हळदी मध्ये मध घालून मिश्रण 

 हळदीत थोडी मध घालून ते मिश्रण चेहऱ्यावर लावा. त्वचा हेल्दी, कोमल आणि उजळ होईल.

१२. खोबरेल तेल हळदिचे  फायदे 

हळदीत आणि खोबरेल तेलात अंटी फंगल गुणधर्म असतात. त्याचबरोबर खोबरेल तेल मॉश्चराईजिंगचेही काम करते. हळद आणि खोबरेल तेल एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.

१३. ऑलिव्ह ऑइल हळदिचे फायदे 

ऑलिव्ह आईलमध्ये हळद घालून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेची लवचिकता टिकून राहते. त्याचबरोबर त्वचा मऊ मुलायम होते.

१४. हळद आणि लिंबाच्या रसाचे फायदे 

हळदीत लिंबाचा रस, मध मिक्स करुन लावल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. त्यासाठी चमचाभर हळद, लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि मध एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर १५-२० मिनिटे लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *