Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - रेखा जरे यांच्या घरातून जप्त केला नवा पुरावा! बाळ बोठे आणखी गोत्यात!

No comments

    News24सह्याद्री -




यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा रेखा जरे यांच्या घरातून पोलिसांनी डायरी जप्त केली असताना आता आणखी एक गंभीर गोष्ट समोर आली आहे. बाळ बोठे आणि रेखा जरे या दोघांनी चार दिवसांचा भोपाळ दौरा केला असल्याची माहिती समोर आली आहे. सन २०१७ मध्ये दि. २७ फेब्रुवारी ते ३ मार्च या चार दिवसात हे दोघेही भोपाळ शहरात होते. पुण्याहून एकाच विमानाने दोघेही गेले आणि पुन्हा दोघांनी परतीचा प्रवास देखील विमानाने एकत्रीतच केला असल्याचे विमान तिकीटांवरून स्पष्ट झाले आहे. रेखा जरे यांच्या घरातून विमानाची ही तिकीटे जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या दोघांचा हा भोपाळ दौरा कशासाठी होता याच्या खोलात पोलिस गेले असता आणखी एक धक्कादायक बाब समोर आलीय! भोपाळ विद्यापीठात रेखा जरे यांचा पीएचडीचा प्रस्ताव देण्यात आला होता.

भोपाळ विद्यापीठातून अशा प्रकारे डॉक्टरेटची पदवी अर्थात पीएचडीची पदवी मिळवून देण्यासाठी नगर शहरातील नागपाल ऊर्फ बिट्टू हा एजंट म्हणून काम करीत असल्याचे समोर आले आहे. बिट्टू याच्या मध्यस्थीने भोपाळ विद्यापीठात पीएचडीचा प्रबंध सादर केला गेला. हा प्रबंध सादर करण्याच्या नावाखाली बाळ बोठे व रेखा जरे हे दोघेही चार दिवस सोबत होते. या चार दिवसात बोठे याने जरे यांना जसे प्रेम दिले तशीच अमानूष मारहाण देखील केल्याची नोंद ‘त्या’ डायरीत आढळून आलीय! पोलिसांनी याबाबतची संपूर्ण माहिती मिळवली आहे. डॉक्टरेट पदवीचे मोठे रॅकेट यापूर्वीच पोलिसांनी उघडकीस आणले आहे. आता पोलिसांना नगरमधील बिट्टू उर्फ नागपाल याचा शोध घ्यावा लागणार आहे. नागपाल यास पकडल्यानंतर नगरसह अन्यत्र कोणी- कोणी पीएचडीच्या बोगस पदव्या मिळवल्या हे समोर येईलच. जरे यांना डॉक्टरेट मिळवून देण्याचे अमिष दाखवत त्यांच्यावर अत्याचार करणारा, मारहाण करणारा बाळ बोठे याच त्यांचा मारेकरी ठरला हे दुर्दैव!

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *