1 जानेवारी डिसेंबर सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - निवडणूक समोर ठेऊन औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव - देवेंद्र फडणवीस...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. नवीन वर्षाची सुरुवात मंगलय, भाविकांची मंदिरात गर्दी
नव्या वर्षाचा हा पहिला सूर्योदय सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी घेऊन येवो. ही सदिच्छा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात बाप्पाच्या दर्शन व्हावे यासाठी सिद्धीविनायक परिसरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केलीय. ज्यांनी ऑनलाईन बुकींग केलंय त्यांनाच आतमध्ये जाऊन दर्शनाची परवानगी आहे.
2. निवडणूक समोर ठेऊन औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव - देवेंद्र फडणवीस

काँग्रेसने संभाजीनगर नावाला विरोध केला काय किंवा नाही काय शिवसेना हा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता वापरते निवडणूक आल्यामुळे शिवसेनेनं औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव तयार केला आहे अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.
3. गृहमंत्र्यांचं पुणे पोलीस आयुक्तालयात नववर्षाचं सेलिब्रेशन
पोलीस दलाचा उत्साह आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी गृहमंत्री पुण्यात गेले. यावेळी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत केक कापत त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं. तसंच वायरलेसवरुन कर्मचाऱ्यांशी संवाद साधत शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर नियंत्रण कक्षात जाऊन स्वत: काही फोन कॉल्सना उत्तरही दिलं.
4. रविकांत तुपकरांचा आगळा वेगळा 31st
नवीन वर्षाचे स्वागत होत असतांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आगळा वेगळा 31 st साजरा केला. बुलढाणा जिल्ह्यातील नांद्राकोळी गावात श्रीकृष्ण काळवाघे यांच्या शेतात रात्री गव्हाला पाणी देवून परिसरातील शेतकऱ्यांसोबत रात्र घालवली. शेतकऱ्यांसोबत चटणी - भाकर खावून जेवण केले.
5. चुकीच्या मतदार यादीमुळे संपूर्ण गाव मतदानाला मुकणार
जिल्हा प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मतदार याद्यांमध्ये अनोळखी लोकांचा मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर चांगलाच गोंधळ उडाला आहे.
6. महाबळेश्वरच्या पसरणी घाटात भीषण अपघात
महाबळेश्वरमध्ये 34 प्रवाशांना घेऊन जात असताना पसरणी घाटात बसचा अपघात झाला. या अपघातात 5 प्रवासी जखमी झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ड्रायव्हरने वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे नववर्षांच्या पूर्व संध्येला मोठा दुर्घटना टळली.
7. मराठमोठ्या जिल्हाधिकाऱ्याचं झारखंडमध्ये उत्कृष्ट काम, पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान
कामाच्या मागे दृष्टी आहे ती एका मराठमोळ्या अधिकाऱ्याची. कोडरमाचे जिल्हाधिकारी तथा उपायुक्त रमेश घोलप यांच्या नेतृत्वात हे यश मिळवलं आहे. कोडरमाचे जिल्हाधिकारी तथा उपायुक्त रमेश घोलप आणि नगर प्रशासक झुमरी तिलैया कौशलेस कुमार यांचा सन्मान पंतप्रधानांच्या हस्ते आज एका ऑनलाईन कार्यक्रमात होणार आहे.
8. गोव्याच्या राजकारणात गाजत आहे गांजा लागवडीचा मुद्दा
विरोधी पक्षांकडून या प्रस्तावावरुन टीकेचा भडीमार सुरू झाल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आता औषधी वापरासाठी राज्यात गांजा लागवडीचा प्रस्ताव सरकारकडे आला आहे. पण या प्रस्तावाला परवानगी देण्याचा विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

9. ठोक भाजी विक्रेत्यांकडून अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण
दोन महिन्यांपासून काही ठोक भाजी विक्रेत्यांनी पुन्हा मुख्य शहरातील जनता भाजी बाजारात व्यवसाय सुरू केलाय हा ठोक भाजी बाजार बंद करण्यात यावा या मागणी साठी काही ठोक भाजी विक्रेत्यांनी अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलंय जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत हे साखळी उपोषण सुरूच राहील असे भाजी विक्रेत्यांनी संगीतलेय.
10. गंगापूर तालुक्यात निवडणुकीच्या पार्शवभूमीवर अधिका-यांना निवेदन
महिला मतदान अधिकारी यांना मतदान संपल्यानंतर तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे.यासह इतर मागण्या साठी शिक्षकसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन सुनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना गंगापूर तालुका शाखेच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी सारिका शिंदे,यांच्याशी चर्चा करून नायब तहसीलदार बालचंद तेजीनकर यांना निवेदन देण्यात आले
No comments
Post a Comment