गॉसिप कल्ला - रणबीर कपूर आणि अनिल कपूरसोबत पहिल्यांदाच सोबत
News24सह्याद्री - रणबीर कपूर आणि अनिल कपूरसोबत पहिल्यांदाच सोबत...पहा गॉसिप कल्ला
TOP HEADLINES
1. नाना पाटेकर यांचा ७० वा वाढदिवस
नानांना स्केचेस बनवण्याचा छंद आहे.नाना पाटेकर हा आयुष्यात प्रचंड खस्ता खाल्लेला त्या धडपडीतून सावरून शिकून उभा राहिलेला असा एक अभिनेता आहे. जगाची व जगण्याची जाण असलेला हा एक उत्तम नट नव्हे तर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीचा नटसम्राट आहे 2. रणबीर कपूर आणि अनिल कपूरसोबत पहिल्यांदाच सोबत
अनिल कपूर यांनी चित्रपटाची घोषणा करत एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे ज्यामध्ये चित्रपटाशी संबंधित माहिती दिली जात आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि अनिल कपूरशिवाय बॉबी देओल आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.3. अक्षयपासून सारा अली खानपर्यंत, ‘नववर्षाची धडक, सेलिब्रेशन कडक’
एकीकडे, बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी आपल्या कुटुंबियांसह आणि मित्रांसह नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दुसऱ्या देशात गेले आहेत तर काहीजण देशातील वेगवेगळ्या ठिकाणी पोहचे होते. तर दुसरीकडे काही जणांनी घरातल्यांसोबतच नवीन वर्षाचे स्वागत केले. अमिताभ बच्चनपासून सारा अली खानपर्यंत बॉलिवूड स्टारने नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले.
4. नव वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी शिल्पा शेट्टी कुटुंबासह गोव्यात
शिल्पा सध्या कुटुंबासह गोव्यात सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. मात्र, गोव्यात असूनही शिल्पा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. गोव्यातील विविध फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत आहे
5. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’मालिका महत्त्वाच्या टप्यात
ज्योतिबाच्या अवताराची गोष्ट या पौराणिक मालिकेच्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. त्यामुळे गेले अनेक दिवस या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. अशात ही मालिका आता एका महत्वाच्या वळणावर येऊन ठेपली आहे.
No comments
Post a Comment