6 जानेवारी Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - सोन्या-चांदीच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
पहिला टप्पा 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान तर दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे हे दोन्ही सभागृहांनी संबोधित करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
2. आ. रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र
रोहित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही यात लक्ष घालण्याचं रोहित पवारांना आश्वासन दिलंय.
3. मुख्यमंत्र्यांकडून पंचगंगेतील प्रदूषणाची गंभीर दखल
नदी प्रदूषण नियंत्रणासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करण्यात यावी. त्यांना थेट टाळे लावण्यात यावे आणि त्यांनी नियमांची पुर्तता केल्यानंतरच टाळे उघडण्यात यावे, अशा सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. 4. डोंबिवलीत उंबार्ली टेकडी वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींच आंदोलन
या आंदोलनात लहानमुले, महिलावर्ग तसेच जेष्ठ नागरिक सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी अंदोलनकर्त्याना भेट देत म्हाडा आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत पर्यावरणाचा ह्यास होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.
5. सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीदिनाचे औचित्य साधून महिलांचा सत्कार
बेटी बचाव,बेटी पढाओ आणी माझी कन्या भाग्यश्री या शासनाच्या उपक्रमाअंर्तगत प्रकल्प अधिकारी सुर्वणा जाधव व संरक्षण अधिकारी काशीनाथ साखरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच कोरोना काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता निस्वार्थ सेवा देणा-या अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचा-यांंचा कोविड योध्दा म्हणुन गौरव करण्यात आला.
6. विज बिल भरण्यासाठी पथकाकडून जनजागृती
महावितरण कर्मचार्यांनी वीज देयक भरणा संबंधि केलेल्या आवाहनाला स्थानिक ग्राहकांनीदेखील मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. यावेळी ग्राहकांना एक गाव एक दिवस या योजनेचा लाभ घ्यावा व काही तक्रारी असल्यास त्या दिवशी त्वरित निकाली काढण्यात येणार आहे असे सांगितले.
7. भामरागड तालुक्यातील जनतेची प्रतीक्षा लवकरच संपणार
भामरागड तालुक्यातील जनतेची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपणार असून पर्लकोटा नदीवर नवीन पूलाचे निर्माण होणार असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पुरामुळे होणारे जनतेच्या समस्यांना पूर्णविराम मिळणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेत आनंद सुर उमटत आहेत
8. तलवारीने कापला केक; तीन जण पोलिसांच्या जाळ्यात
जिल्हाधिकाऱ्यांच्या आपत्ती व्यवस्थापन आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक ठिकाणी प्राणघातक शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पंकज साबळे , आकाश गमरे,संदेश जगताप अशी ह्या तिघां तरुणांची नावे आहेत.
9. रेल्वेमार्गाच्या प्रत्यक्ष कामाला तात्काळ सुरुवात व्हावी - रविकांत तुपकर
लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला. पण जनतेच्या रेट्यापुढे सरकारला झुकावे लागले. तरी 2021 मध्ये या रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळून प्रत्यक्ष जलदगतीने कामाला सुरुवात झाली पाहिजे, अशी अपेक्षा रविकांत तुपकरांनी यावेळी व्यक्त केली.
10. सोन्या-चांदीच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या
No comments
Post a Comment