3 जानेवारी Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - कफ सिरपमध्ये अंमली पदार्थ मिसळून विक्री करणाऱ्याला अटक....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
TOP HEADLINES
1. 'डिसीजीआय' ची आज पत्रकार परिषद
आज सकाळी ११ वाजता डिसीजीआय महत्वपूर्ण पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे डिसीजीआय आज काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
2. भारतीय लस कोवॅक्सिनला तज्ज्ञ समितीची मंजुरी
कोवॅक्सिन ही भारत बायोटेकद्वारा विकसित केलेली देशी लस आहे. अशा प्रकारे तज्ञ समितीने मंजूर केलेली ही दुसरी लस आहे. यापूर्वी, ऑक्सफोर्ड लसीला तज्ज्ञ समितीने हिरवा कंदिल दाखवला आहे.
3. कोरोनाची लस कुण्या पक्षाची नाही, मी आनंदाने घेईन – ओमर अब्दुल्ला
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी अखिलेश यादव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ही लस कुण्या पक्षाची नाही, आपण आनंदाने ही लस घेऊ, असं ओमर अब्दुल्ला म्हणाले आहेत.
4. भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ईडीच्या नोटिसाही सोबत येतात
भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या प्रवेशात सोबत ईडीच्या नोटिसाबरोबर येतात”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजपवर केलीय, त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.
5. चंद्रकांत पाटील यांचे रश्मी ठाकरेंना पत्र
आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरु ठेवू शकता, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
6. कफ सिरपमध्ये अंमली पदार्थ मिसळून विक्री करणाऱ्याला अटक
आसिफ अब्दुल सत्तार असे अटक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याला कामाठीपुरात परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून औषधमिश्रित सुमारे 25 लाख रुपयांचं ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे.
7. समाजमंदीराचे काम निकृष्ट दर्जाचे
संबधीत ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी,वनवा समता परीषदेचे अध्यक्ष निलेश पवार यांनी मनपा आयुक्त व आमदार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
8. लसीकरणासाठी राज्य शासन सर्वोतोपरी सज्ज- आरोग्यमंत्री टोपे
आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर कोरोनाच्या लसीकरणासाठी मतदान केंद्राप्रमाणे बुथची स्थापना करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले
9. बाळासाहेबांची इच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पूर्ण करावी - आ. राजू पाटील
मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील बाळासाहेबांची इच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण करावी व कोणाच्याही दबावाला बळी न पडता लवकरच निर्णय घेतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान इतर पक्षांनी यात राजकारण करू नये असेहि आमदार राजू पाटील यावेळी म्हणाले.
10. रोहित शर्मासह पाच भारतीय क्रिकेटपटू आयसोलेशनमध्ये
रोहित मेलबर्नमध्ये दाखल झाला आणि त्याने टीम इंडियातील आपल्या सहकाऱ्यांची आणि इतर सदस्यांची गळाभेट घेतली. त्यानंतर उर्वरित दोन सामन्यांसाठी त्याला संघाचा उपकर्णधार करण्यात आलं. पण एका महत्त्वाच्या कारणामुळे रोहित शर्मासह भारताच्या पाच क्रिकेटपटूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
No comments
Post a Comment