Breaking News

1/breakingnews/recent

यश साजरा करतोय आज त्याचा 34 वा वाढदिवस

No comments
मुंबई -

कन्नड चित्रपटसृष्टीतील सध्याचा सर्वाधिक मानधन घेणारा हिरो आणि केजीएफ  चित्रपटाच्या माध्यमातून देशभरातील चित्रपट रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता यश याचा आज 34 वा वाढदिवस आहे.   एका दशकाच्या काळात यशने जोरदार प्रगती केली असून तो सध्या कन्नड भाषेतला सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार आहे. 

कन्नड चित्रसृष्टीतला सर्वांत महागडा चित्रपट केजीएफच्या अद्वितीय यशानंतर सध्या तो एका प्रोजेक्टसाठी 15 कोटी रुपये घेतो. देशभर यश मिळवणारा केजीएफ हा चित्रपट कन्नड भाषेतील 200 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला असून या वर्षी प्रदर्शित होणारा केजीएफ 2 त्याहून यशस्वी ठरेल आणि कन्नडमधील 500 कोटींचा व्यवसाय करणारा पहिला चित्रपट ठरेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *