Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - ‘बिग बॉस’च्या टॅलेंट मॅनेजरचा अपघातात मृत्यू

No comments

 News24सह्याद्री ‘बिग बॉस’च्या टॅलेंट मॅनेजरचा अपघातात मृत्यू...पहा गॉसिप कल्ला




TOP HEADLINES


1. अभिनेत्री मौनी रॉय लवकरच बोहल्यावर चढणार 
 मध्यंतरी लॉकडाउनच्या काळात मौनी तिच्या बहिणीच्या घरी दुबईमध्ये होती. त्याचवेळी तिची आणि सूरजची ओळख झाली. सध्या हे दोघ एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.मौनीने मध्यंतरी सूरजसोबत काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने सूरजसोबतचं नातंही  जाहीर केलं होतं. 

2. तांडव वेबसिरीजला भाजपचा विरोध 
 मनोज कोटक यांनी सूचना आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहिलं आहे. त्याचबरोबर वेबसिरीजच्या निर्मात्याने माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

3. ‘बिग बॉस’च्या टॅलेंट मॅनेजरचा अपघातात मृत्यू 
सहकारी मैत्रिणीसोबत घरी जाण्यास निघाली असता, अंधारात अंदाज न आल्यानं अॅक्टिवा स्कूटर एका खड्ड्यात जाऊन अडकली आणि या अपघातात पिस्ता धाकडचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातानंतर मनोरंजन विश्वात शोक व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणी अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

4. दीया मिर्झाच्या माजी मॅनेजरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
काही दिवसांपूर्वीच एनसीबीच्या मुंबई युनिटनं मुंबईच्या तीन भागात छापा मारला आणि दोन महिला आणि एका ब्रिटीश नागरिकाला अटक केली होती. या छाप्यात सुमारे 200 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये बॉलिवूडची माजी मॅनेजर राहीला फर्निचरवाला, शाहिस्ता फर्निचरवाला आणि करण सजनानी या ब्रिटिश नागरिकांचा समावेश आहे.

5. करीना कपूरने शेअर केला आपल्या नव्या घराचा फोटो
 करीनाच्या घरातील एका खोलीतील बेड, डार्क हार्डवुड फ्लोर, ग्रिड पॅनलिंगसह काचेचे दरवाजा आणि टेरेस परिसर दिसत आहे. हा फोटो शेअर करताना करीना कपूरने एक खास कॅप्शनही दिले आहे.फोटो कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे की, 'नवीन सुरुवात करण्यासाठी दरवाजा'. करीना कपूर खानच्या नवीन घराचे चित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *