Breaking News

1/breakingnews/recent

17 जानेवारी सह्याद्री बुलेटिन

No comments

        News24सह्याद्री - शेतकऱ्यांचा एक कोटींचा संत्रा दलालाने विकला परस्पर....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES


1. आपल्यासाठी संभाजीनगरच’ -संजय राऊत
औरंगाबादच्या नामांतराबद्दल शिवसेनेकडून सातत्यानं भूमिका मांडली जात आहे. “आमच्यासाठी औरंगाबाद नाही, तर संभाजीनगरच आहे, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जोर देऊन सांगितलं आहे.  

2. भाजपा नेते आशिष शेलार यांचा शिवसेनेवर निशाणा
संभाजीनगरचा राज्याच्या अस्मितेचा विषय येताच काँग्रेसला “कोपरापासून साष्टांग दंडवत”! सत्तेसाठी एवढी लाचारी? कुठे फेडाल ही पापे सारी?” असं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

3. ठाणे शहरात ३५० बसगाडय़ांवर जाहिराती प्रदर्शित करण्यास सवलत 
 ३५० बसगाडय़ांवर जाहिरात प्रदर्शित करण्याचे हक्क देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. या प्रस्तावामुळे तीन वर्षांसाठी उपक्रमाला १० कोटी ११ लाख ७२ हजार २४ रुपयांचे उत्पन्न मिळू शकणार आहे.

4. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री थेट रस्त्यावर उतरणार
महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. कारण येत्या आठवड्यात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरणार आहेत. तशी माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री आणि राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

5. तीन मित्रांमध्ये वाद तर चौथ्याने केला हवेत गोळीबार
 भुसावळ शहर पुन्हा एकदा हादरुन गेले. यात कुणालाही इजा झालेली नाही. यावेळी पोलिसांना घटनास्थळी दोन काडतुसे आढळून आली आहेत. गोळीबार होताच चारही जण तिथून पसार झाले. गोळीबाराचा आवाज होताच कॉलनीतील नागरिकांनी पोलिसांना कळविले.

6. काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर
काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला आहे. धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता, असं माजी खासदार आणि काँग्रेस नेते हुसेन दलवाई म्हटलं आहे. चिपळूनमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

7. शेतकऱ्यांचा एक कोटींचा संत्रा दलालाने परस्पर विकला
शेतकऱ्यांसोबत जाऊन दलालाची थातूरमातूर चौकशी करण्यापलीकडे पोलिसांनी काहीच केले नाही, असे संबंधित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

8. गंगापूर आगारात इंधन बचत मोहीम संपन्न
 प्रसंगी विशाल साबने सर, विशाल गायकवाड सर, जवळेकर साहेब यांनी कर्मचाऱ्यांना इंधन बचत बाबत मोलाचे मार्गदर्शन केले. उत्कृष्ट इंधन बचत करणार्‍या चालकांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्प देऊन सत्कार करण्यात आले.  

9. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहराला स्वछ ठेवण्याची घेतली शपथ
महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून मोहिमेची सुरुवात करण्यात आली व सभापती हरेश देवावाले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी राजू मोरे स्वच्छता निरीक्षक शामसंग कसबे विभागाचे दफेदार रवींद्र कल्याणी संतोष पाटोळे मंगेश साठे या नगर परिषदेचे कर्मचारीची उपस्थित होती

10. पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीनीं  लस का टोचून घेतली नाही -  प्रकाश आंबेडकर
 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना लसीचा शुभारंभ केल्याचा उदो उदो करीत आहेत.जुन्या काळात शिकारी ढोल बडवित होते तसा हा प्रकार आहे.पंतप्रधान  आणि मुख्यमंत्र्यांनि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी स्वत: लस का टोचून घेतली नाही..? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केलाय.
 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *