Breaking News

1/breakingnews/recent

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन व नताशा दलाल अडकणार लग्नबंधनात

No comments


मुंबई - 

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल हे या महिन्याच्या शेवटी लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आलीय. गेल्या वर्षी मे मध्ये वरुण आणि  नताशाचे लग्न होणार होते, मात्र कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे या दोघांचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नासाठी अलिबागमधील एक हॉटेल बुक करण्यात आले आहे.

लग्न पंजाबी चालीरितीप्रमाणे होणार असून  200 लोक या लग्नाला हजेरी लावणार आहेत. लीकडेच वरुण धवन यासंदर्भात अलिबागमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचला होता. या जोडप्याचे काही खास फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लवकरच हे देखील जोडपे त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची खुशखबर देणार आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *