Breaking News

1/breakingnews/recent

13 जानेवारी सह्याद्री बुलेटिन

No comments

    News24सह्याद्री - राज्यात पुन्हा एकदा थंडीचं आगमन होणार...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये



TOP HEADLINES


1. महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस मिळाले
केंद्राच्या सुचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्याही 511 वरुन 350 पर्यंत कमी करण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. आज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लस दाखल होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं वक्तव्य अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे  

2. पण मी मरेपर्यंत लढेन -  रेणू शर्मा
 रेणू शर्मा यांनी ब्लॅकमेलच्या मुद्द्याशिवाय मुंडे आणखी काय बोलणार? असं सांगत आपण शेवटरपर्यंत लढणार असल्याचं म्हटलं आहे  

3. असदुद्दीन ओवेसी यांनी  अखिलेश यादव यांच्यावर साधला निशाणा 
मी मैत्री निभवण्यासाठी आलो आहे. आम्ही दोघं यूपीमध्ये टक्कर देऊ, असं ओवेसींनी बोलून दाखवलं आहे. यानंतर ओवेसी जौनपूरकडे रवाना झाले.  

4. धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे का?
पहिल्या बायकोपासूनची तीन मुले आणि करुणापासून झालेली दोन मुले अशी पाच मुले असल्याचं मुंडे यांनी स्वत:च कबूल केलं आहे. दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास कायदेशीररित्या निवडणूक लढवण्यास मनाई असताना मुंडे यांना पाच मुले असल्याचं उघड झाल्याने त्यांची आमदारकीही धोक्यात आहे का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे  

5. राज्यात पुन्हा एकदा थंडीचं आगमन होणार
वातावरणानंतर राज्यातील किमान तापमानात लक्षणीय वाढ होऊन थंडी पूर्णपणे गायब झाली होती. उत्तरेकडील काही राज्यांमध्ये एक-दोन दिवसांत थंडीची लाट येणार आहे.

6. अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी
राजीनामा किंवा मृत्यू झाल्यानंतर भारतीय विमा निगमतर्फे लाभाची रक्कम एकरकमी प्रदान करण्यात येते. ऑनलाईन पोर्टल विकसित केल्यास हक्काची रक्कम तत्परतेने मिळू शकत असल्याचे डॉ. ओंबासे यांनी स्पष्ट केलंय.

7. 72 तासात Telegram च्या यूजर्सच्या संख्येत  अडीच कोटींची वाढ
 WhatsApp च्या नव्या धोरणांचा फायदा हा इतर अॅपना होताना दिसतोय. याचमुळे गेल्या केवळ 72 तासात Telegram च्या यूजर्समध्ये अडीच कोटी नव्या यूजर्सची भर पडली आहे.

8. शेतकरी कुणाच्या तरी सांगण्यावरून आंदोलन करतायेत -  हेमा मालिनी
 शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीसोबत चर्चा करण्यास नकार दिला असून, आंदोलन कायम ठेवलं आहे. या भूमिकेवरून भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांनी शेतकरी आंदोलनाविषयीच शंका उपस्थित केली आहे.

9. सिंचनासाठी १५ मार्च पर्यंतच पाणीपुरवठा केला जाणार   
पुढेही रोटेशन प्रमाणे पाणी सोडण्यात येणार असून त्या वरून  सिंचनासाठी पाणी 15 मार्च पर्यन्त  सोडण्यात येईल याबाबत शेतकर्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे उपविभाग बोरगाव मंजू यांच्या वतीनं करण्यात आले आहे.

10.  शहीद वैभव माहुलकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.  
मंगळवारी पाहटे त्यांचे पार्थिव मलकापूर येथे आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार अमोल मिटकरी, एसडीओ नीलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे, पोलीस निरीक्षक डी.सी.खंडेराव, वंचितचे पराग गवई सह आदींची उपस्थिती होती.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *