Breaking News

1/breakingnews/recent

8 जानेवारी सह्याद्री बुलेटिन

No comments

        News24सह्याद्री - बामणी पोलिसांनी कार सह देशी दारू जप्त....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES


1. जिंतूर येथे कोरोना योद्धे व पत्रकार यांचा सन्मान
पत्रकार व कोरोना योद्ध्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी यांनी केले तर  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख शकील व शहजाद पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन शेख अलीम यांनी केले. यावेळी तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते  

2. नगरविकास विभागाकडे करनार तक्रार नगर सेवक 
करन्यासाठी जात असताना .कुत्र्याने हल्ला केलाय तर  4 दिवसात हि दुसरी घटना घडली आहे त्यामध्ये जखमी व्यक्तीला  20 टाके पडलेत .यामुळे नगर परिषदेला  जाग कधी.येनार आसा जबाब नगर सेवक विजय पवार यांनी उपस्थित केला तर नगर परिषदेचे मुख्यधिकारी नितिन नार्वेकर गांभीर्याने घेत नसल्यामुळे आता नगर सेवक विजय पवार थेट नगरविकास याच्याकडे तक्रार करनार असल्याचे विजय पवार यांनी सागितले

3. बामणी पोलिसांनी कार सह देशी दारू जप्त 
 दिनांक 3 जानेवारी रोजी कोरवाडी येथील राहुल डाखोरे व विष्णू कणसे या दोघांवर दोन ठिकाणी छापा मारून चार बॉक्स जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि कल्पना राठोड यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस नाईक वाघमारे हे करीत आहेत.  

4. अकोला जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन
ड्राय रन मध्ये २५ व्यक्तींच्या नोंदी व तपासणी आदी प्रक्रिया करण्यात आली आरोग्य कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी ड्राय रन घेण्यात आलाय.सुरुवातीला अकोल्यातील  731 कोरोना यौध्याना ही लस देण्यात येणार आहे. त्या साठी आज ड्राय रन प्रक्रिया पार पडलीय.यावेळी जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन, या सह आरोग्य यंत्रणेमधील सर्वच अधिकारी उपस्थित होतेय.

 5. नगरसेवक महेश कोठेंची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी
सोलापूरचे शिवसेना नगरसेवक महेश कोठेंची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आलीये .मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंने हे आदेश दिलेत महेश कोठे हे  राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती तयामुळे त्यांची शिवसेनेतून कायमची हक्कलपट्टी करण्यात अली आहे अशी माहिती  शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनि दिलीये..

6. २०२० मध्ये स्विफ्ट कारची सर्वाधिक विक्री  
१५ वर्षांत हा विक्रम स्विफ्टच्याच सेडान मॉडेल डिझायरनं २०१८ मध्ये केला होता. मात्र  २०२० मध्ये यात डिझेल मॉडेलचा पर्याय उपलब्ध नसल्यानं सर्वाधिक फटका हा डिझायरच्या विक्रीला बसल्याचं म्हटलं जात आहे.

7. नाशिकमध्ये सेनेच्या २ नेत्यांची घरवापसी
वसंत गीते आणि सुनील बागूल अशी या नेत्यांची नाव आहेत.शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या नेत्यांची काल भेट घेतली. त्यानंतर त्यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्याचे म्हटले जात आहे. यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचही बोलले जातय.  

8. जगण्याचा मूलभूत अधिकार हा धार्मिक अधिकारापेक्षा मोठा
तामिळनाडूमधील एका मंदिरातील महोत्सवाचे आयोजन करताना करोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करुन धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भातील निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.यावेळी “धार्मिक परंपरा या जनहित जपणाऱ्या तसेच जीवनाचा अधिकार देणाऱ्या असायला हव्यात,” असं न्यायमुर्ती संजीब बॅनर्जी म्हणालेत.

9. लसीकरणाचा खर्च केंद्र सरकारने करावा-राजेश टोपे 
लसीकरणासाठीच्या कोल्ड चैन आणि लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च केंद्र सरकारने द्यावा अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केलीय. दरम्यान पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा पहिला डोस अंदाजे अडीच महिन्यात पूर्ण होऊ शकेल असा अंदाज राजेश टोपे यांनी व्यक्त केलाय.

10. महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये ड्राय रन मोहिम
आज ८ जानेवारी ला महाराष्ट्राच्या ३० जिल्ह्यांत आणि २५ महापालिका क्षेत्रांमध्ये करोना लसीकरणाचं ड्राय रन केलं जात आहे. या मोहिमेसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून विविध ठिकाणी या ड्राय रनला सुरुवातही झाली आहे. यापूर्वी २ जानेवारीला  पुणे, नंदुरबार, जालना आणि नागपूर जिल्ह्यात ड्राय रन करण्यात आलं होतं.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *