Breaking News

1/breakingnews/recent

राज्यात नामांतराशिवाय कोरोना, लसीकरण यावर काम होणे गरजेचे - अजित पवार

No comments


मुंबई -

औरंगाबाद नामांतरावरुन राज्यातले वातावरण चांगलेच तापले आहे. वातावरण ढवळून निघाले आहे. औरंगाबादच्या नामांतरावरुन चांगलाच गोंधळ सुरू आहे. नामांतर झालेच पाहिजे, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. काँग्रेसने नामांतराला कडाडून विरोध केला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीने मात्र सावध भूमिका घेत नामांतराचा प्रश्न महाविकास आघाडी एकत्रित बसून सोडवेल, असे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत, असे पुन्हा एकदा ठणकावून सांगताना लसीकरण, कोरोना याविषयी काम करणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. 

यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. नामांतराचा मुद्दा हा महाविकास आघाडी एकत्रित बसून सोडवेल. याव्यतिरिक्त राज्यात अनेक प्रश्न आहेत. लसीकरण, कोरोना याविषयी काम करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे नामांतराचा मुद्दा तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून सोडवतील असे म्हणत नामांतरावर त्यांनी शिष्टाईची भूमिका दाखवली. राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होतायत. मात्र पुढचे काहीच पक्षप्रवेश होताना प्रवक्ते हे माध्यमाला सांगतील. त्यामुळे तो काही मोठा प्रश्न नाही असे म्हणत अप्रत्यक्षपणे पुढच्या काळात पक्षप्रवेश होतील, असे सूचकपणे अजित पवार यांनी सांगितले आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *