Breaking News

1/breakingnews/recent

5 जानेवारी डिसेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

     News24सह्याद्री - मायलेकराचा संशयास्पद बुडून मृत्यू...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1. परराज्यातून येणाऱ्या धान्यांनी भरलेल्या ६ ट्रॅक वर कारवाई
 जिल्ह्यातील आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर विक्री करत आहे, त्यामुळे  पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून परराज्यातून येणाऱ्या ट्रकची तपासणी करत कारवाही करताना पाहायला मिळत आहेत,

2. रेल्वे मंत्री आणि कृषी मंत्री यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार
आचार संहिता सुरु असताना कोणतीही उद्घाटन करू नयेत असे नियम असताना हे नियम थेट पंतप्रधान यांनी मोडल्याने यांच्यासह यात सहभागी असणाऱ्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार दिली आहे.

3. सुभाष देसाईंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार
चंद्रकांत पाटील यांना औरंगाबादच्या नामांतराविषयी इतकीच बांधिलकी होती तर तुमचे सरकार असताना हा निर्णय का घेण्यात आला नाही? तेव्हा तुमचे मुख्यमंत्री झोपा काढत होते का, असा खरमरीत सवाल सुभाष देसाई यांनी भाजपला विचारला.  

4. राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब
तरुणी नॉट रिचेबल असल्‍याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या संपूर्ण यंत्रणा या तरुणीचा शोध घेत आहे. आरोपीला अटक करत नाही तोवर पोलिसांनी घरी येऊ नये, असा पवित्रा तरुणीने घेतला होता.  

5. नागपुरात विधीमंडळ सचिवालय सुरु
 विदर्भातील आमदारांना आपले प्रश्न, लक्षवेधी सूचना किंवा इतर कामांसाठी वेळोवेळी मुंबईत जाण्याची गरज आता लागणार नाही. त्याची सुरुवात काल काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी केली आहे.   पहिल्या दिवशी उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी मागण्यांचं पत्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना दिलं आहे.  

6. गिरीश महाजन यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, भाजपच्या गोटात खळबळ
 भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री गिरीश महाजन  यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महाजन यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.  

7. लवकरच मुंबईची 'लाइफ लाइन' सर्वांसाठी धावण्याची शक्यता
कालांतराने काही ठराविक वेळेत आणि ठराविक लोकांसाठी ती सुरू देखील झाली. मात्र आता मुंबईकरांना प्रतीक्षा आहे ती, लोकलसेवा पुन्हा एकदा सुरळीत सुरू होण्याची. कमी गर्दीच्या वेळेमध्ये अर्थात सकाळी 7 पूर्वी आणि रात्री 10 वाजल्यानंतर सर्वांना लोकलने प्रवास करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे.

8. SP तेजस्वी सातपुतेंचा पोलीस कुटुंबीयांसाठी आनंदी निर्णय
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीसांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना किमान त्यांचा वाढदिवस त्यांचे कुटुंबीयासमवेत साजरा करता यावा, यासाठी त्यांना एकदिवस निश्चित सुट्टी देण्याचा निर्णय पोलीस अधीक्षकांनी घेतला.

9. महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतींच्या पुनर्विकासातून लोकप्रतिनिधींचा विकास
बिल्डर लॉबी लोकप्रतिनिधींना हाताशी धरुन रहिवाशांना बेघर करण्याच्या योजन आणत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.  

10. मायलेकराचा संशयास्पद बुडून मृत्यू
नांदेड शहरातील निलावार कॉम्प्लेक्समध्ये साई भोजनालय कुटुंबातील माय लेकराचा गच्चीवर असलेल्या पाण्याच्या सिंटेक्स टाकीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात असला तरी ही घटना घातपात तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *