Breaking News

1/breakingnews/recent

11 जानेवारी सह्याद्री बुलेटिन

No comments

   News24सह्याद्री - सिग्नल तोडल्याने अडवल्यामुळे रिक्षाचालकाची पोलिसांना मारहाण...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1. बजाजनगर येथे  लसीकरणाची रंगीत तालीम   
लसीकरणाचा त्रास होत असल्याचे महिलेने सांगताच तिला तात्काळ रुग्णवाहिकेतुन पुढील उपचारासाठी हलविण्यात आल्याचे प्रात्याक्षिक करुन दाखविण्यात आले. या लसीकरण केंद्रात जवळपास दिड तास थांबुन जिल्हाधिकारी यांनी लसीकरण मोहिमेचा आढावा घेत आरोग्य अधिकारी व कर्मचाºयांना विविध प्रकारच्या सुचना दिल्या. 

2. अपहरण केलेल्या महीलेची  पोलीसांनी केली सुखरुप सुटका
 एका आड रानामध्ये महीलेने वर्णनकेलेले रेल्वेपटरीच्या बाजुला मोसंबीचे व ऊसाचे शेत मिळुण आल्याने त्याठिकाणी शोधमोहीम सुरु केल्यावर एका झुडपामध्ये घाबरलेल्या स्थितीमध्ये सदर महिला  सापडली , पोलीस ठाणे चंदनझिरा येथे येवुन सदर महीलेच्या तक्रारीवरुन दोन अज्ञात लोंकाविरुध्द रात्री अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांचा शोध सुरु आहे

3. लेण्या, प्राचीन मंदिरांच्या जतनासाठी राज्य सरकार करणार मोठी तरतूद

आळंदी, पंढरपूर ही तीर्थक्षेत्रे, अष्टविनायक, त्याचबरोबरच कुलस्वामिनी तुळजाभवानी, महालक्ष्मी, रेणुकामाता व सप्तशृंगी ही साडेतीन शक्तीपीठे याच राज्यात आहेत. राज्यातील या प्राचीन मंदिरे, लेण्या, गडकिल्ल्यांच्या संवर्धनातून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.


4. मनसेनं सुरू केली नवी वेब सीरिज;'पेंग्विन गेम्स'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एक नवी वेब सीरिज लाँच केली आहे. 'पेंग्विन गेम्स' या नावाखाली त्यांनी एका वेब सीरिजला सुरूवात केली आहे. या वेब सीरिजद्वारे मनसेनं वरळीतील सामान्य नागरिकांना ज्या प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  

5. पुण्यात सलग ४ अपघात 
पुण्यात आज सकाळपासून चार अपघात झाले आहेत  या चार अपघातात एकूण दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत. यामध्ये घटनास्थळाची पाहणी करणाऱ्यासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या दोन वाहनालाही अपघात झाला. यामध्ये चार पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

6. सुरक्षा कपातीवर रुपाली पाटील भडकल्या

राज ठाकरेंची झेड सुरक्षा कमी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याने मनसे नेत्या रुपाली पाटील चांगल्याच भडकल्यात. राज ठाकरे यांचे लाखो चाहते हेच त्यांचं कवच आहे. सरकारने डोकं ठिकाणावर ठेऊन काम करावं, नाहीतर त्यांची अवस्था भाजपसारखी होईल, असा इशारा ही  रुपाली पाटील यांनी दिलाय.

7. संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना जाहीर इशारा

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केले असून शिवसेना त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान  शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर बेफाट आरोप केले जात असून त्यातून काही निष्पन्न होणार नाही असं म्हटलं जात आहे. मात्र यावेळी त्यांनीकेलेले  आरोप सिद्ध झाले नाहीत तर त्यांना जोड्याने मारणार असल्याचं वक्तव्य  खासदार राऊत यांनी केलय. 


8. गुजराती मेळाव्यावरून आशिष शेलार यांचा हल्लाबोल 
 शिवसेनेचं भेसळयुक्त हिंदुत्व झालंय, अशी टीका केली आहे."शिवसेनेने केलेल्या गेल्या पाच वर्षांतील अविकसित कामगिरीवर मुंबईकर जनता नाराज आहे. त्यामुळे त्यांना सर्व मुंबईकर धडा शिकवतील.अशी ते यावेळी म्हणालेत. 

9. सिग्नल तोडल्याने अडवल्यामुळे रिक्षाचालकाची पोलिसांना मारहाण
अक्षय बलभीम जाधव  असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याच्यासह धीरेंद्र प्रताप सिंग याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय ठिगळे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

10. शेअर बाजारात मोठी तेजी,गुंतवणूकदारांची चांदी

भांडवली बाजाराच्या आजवरच्या इतिहासात सेन्सेक्सने पहिल्यांदाच ही पातळी गाठली आहे. आज भांडवली बाजार उघडल्यानंतर सेन्सक्सने सुरुवातीच्या सत्रात 400 अंकांची उसळी घेतली.या तेजीत आयटी कंपन्यांच्या सम भागांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे सेन्सेक्सने  ऐतिहासिक स्तर गाठला. तर निफ्टीमध्येहीअंकांची उसळी पाहायला मिळाली

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *