काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेवर संजय राऊतांचे मोठे भाष्य
मुंबई -
गेल्या काही दिवसापासून पक्षांतर्गत राजकारणामुळे बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या जागी दुसऱ्या मोठ्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपद दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. बाळासाबेत थोरात यांनी सोमवारी दिल्लीत जाऊन ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेत नाराजी जाहीर केल्याची चर्चा होती. बाळासाहेब थोरात यांनी हे वृत्त फेटाळले होते. पण सोबतच जर ती प्रक्रिया सुरु झाली असेल त्याचे स्वागत करतो म्हणत सूचक विधान केले होते. या सर्व घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. विदर्भातील नाना पटोले तिथे अध्यक्ष आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद बदलेले जात असून जी काही नावे आहे त्यात नाना पटोलेंचे नाव असल्याचे मी प्रसारमाध्यमांमध्ये पाहत आहे. आता हा शेवटी त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या एका प्रमुख पक्षातील या घडामोडी आहे. त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कारण आमच्यातील कोणताही पक्ष अंतर्गतसुद्धा अस्थिर होऊ नये, अस्वस्था राहू नये ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. तरच हे तीन पक्षांचे सरकार हे प्रदीर्घ काळ चालणार आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यासंबंधीचा निर्णय काँग्रेसमचे दिल्लीमधील नेते घेतील असेही त्यांनी सांगितले आहे.
No comments
Post a Comment