Breaking News

1/breakingnews/recent

खोडसाळपणा पाहून खासदार सुजय विखे संतापले: राजीनामा देऊ अशी घोषणाच त्यांनी केली

No comments




 मुंबई -

लोकसभा निवडणुकीत भाजप खासदार डॉ.सुजय विखे पाटील हे राहुरी येथील डॉ.बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा सुरळीत चालत नाही. कारखाना वारंवार बंद का पडतो, याची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ.सुजय विखे पाटील गेले असता बॉयलरमध्ये चक्क साखरेची पोती आढळून आली. हा खोडसाळपणा पाहून खासदार सुजय विखे संतापले आणि ७२ तासांत कारभार सुधारला नाही तर आपण संचालक मंडळासह राजीनामा देऊ अशी घोषणाच त्यांनी केली आहे. राहुरीतील डॉ.बाबुराव दादा तनपुरे सहकारी साखर कारखान्यापुढील अडचणी संपायला तयार नाहीत. पूर्वी हा कारखाना विविध कारणांमुळे बंद पडला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी डॉ.विखे यांनी त्यामध्ये लक्ष घातले.

 कामगारांचे प्रश्न सोडविले, जिल्हा सहकारी बँकेत विरोधकांशी जुळवून घेत कर्ज मिळवून दिल निवडणुकीत लक्ष घालून आपले मंडळ निवडून आणले. बंद पडलेला कारखाना सुरू झाला. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. विखे यांना राहुरी तालुक्यात चांगला फायदा झाला. त्यानंतरही विखे यांनी हा कारखाना सुरळीत चालू ठेवण्यावर भर दिला. पदाधिकाऱ्यांमध्ये अवश्यक ते बदल केले. स्वत: विखे तज्ज्ञ संचालक म्हणून कार्यरत आहे. यावर्षीही कारखाना सुरू झाला आहे. मात्र, वारंवार व्यत्यय येऊन गाळप बंद पडून नुकसान होत आहे. त्यामुळेच नेमकी काय अडचण होत आहे, याची पाहणी करण्यासाठी डॉ. विखे यांनी शनिवारी कारखान्याला भेट दिली. पदाधिकारी आणि कामगारांची बैठक घेतली. त्यानंतर बॉयलरमध्ये त्यांना साखरेची पोती आढळून आली. हा प्रकार आपोआप किंवा तांत्रिक बिघाडामुळे मुळीच होऊ शकत नाही. हा कोणी तरी केलेला खोडसाळपणा आहे. याची चौकशी करा, संबंधितांवर कारवाई करा, कारखाना सुरळीत सुरू करा, अन्यथा आपण कारखान्याच्या पदाधिकारी, संचालक मंडळासह राजीनामा देऊ, अशा इशाराच विखे यांनी दिला आहे.




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *